News & View

ताज्या घडामोडी

2023 7image 19 33 30595164222

अर्चना कुटेला ईडी कडून अटक!

मुंबई -ज्ञानराधा मल्टी स्टेट अपहार प्रकरणी अर्चना कुटे यांना सक्त वसुली संचालनाल्याने अटक केली आहे. 2467 कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका कुटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर मुंबई येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुटे यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. इडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय की, तपास यंत्रणांनी ही कारवाई मनी लॉण्डिंगच्या त्या चौकशी प्रकरणांतर्गत केली आहे, ज्याची सुरुवात महाराष्ट्राच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये जुलै 2024 मध्ये केलेल्या एफआयआरच्या आधारावर झाली होती. या एफआयआरमध्ये आरोप आहेत की, सुरेश कुटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

सोसायटीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 12 ते 14 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. तसच यासाठी विविध योजनाही सुरु करण्यात आल्या होत्या. या योजनांच्या माध्यमातून लोकांनी मोठी गुंतवणूक केली. पण त्यानंतर गुंतवणूकदारांच्या ठेवी त्यांना अंशतः परत करण्यात आल्या, त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं.

इडीच्या तपासात उघडकीस आलं आहे की, सोसायटीचे जवळपास 2467 कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून कुटे ग्रुप कंपनीला ट्रान्सफर करण्यात आले होते. या कंपन्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या नियंत्रणात काम करतात, अशी माहिती आहे. कोणतेही अधिकृत कागदपत्रे, कोणत्याही प्रकारची सेक्युरीटी न ठेवता देण्यात आलं होतं. या कर्जाची रक्कम वैयक्तिक लाभ आणि अन्य व्यवसायांच्या गुंतवणुकीसाठी वापरण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. याप्रकरणी ईडीने आधीच अर्चनाचे पती सुरेश कुटे यांना अटक केलं आहे.

अर्चना सुरेश कुटे या कुटे ग्रुप एंड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्या सर्व कंपन्यांच्या कामकाजाची देखभाल करायच्या. अर्चना कुटे यांनी बिझिनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए केलं आहे. अर्चनाने तिरुमल्ला एडिबल ऑयल्स लॉन्च केलं आहे. त्यांनी कुटे ग्रुप फ्लेवर्ड ऑईल, कॉस्मोटिक्स, फार्मा आणि बेव्हरेजेससारख्या क्षेत्रात लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *