News & View

ताज्या घडामोडी

नगर परिषद बीड

बीड नगराध्यक्ष पद एस सी महिलासाठी राखीव!

बीड- बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती च्या महिलेसाठी राखीव झाले आहेत यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक हौसे 900 आणि गौशाला धक्का बसला आहे

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीचे आणि पंचायत समितीच्या सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे नगराध्यक्ष पदासाठी चे आरक्षण साठी सोडत काढण्यात आली.

यामध्ये बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद एस सी महिलेसाठी राखीव झाले आहे

तर ओबीसी प्रवर्गात माजलगाव ओबीसी महिला आणि अंबाजोगाई ओबीसी आरक्षण असणार आहे. गेवराई, धारूर, परळी नगरपालिका खुल्या प्रवर्गासाठी असून यात परळीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असणार आहे.

अनुसूचित जाती महिला : बीड

ओबीसी महिला : माजलगाव

ओबीसी : अंबाजोगाई

सर्वसाधारण महिला : परळी

सर्वसाधारण : गेवराई, धारूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *