बीड –बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या आणि एका महिलेचे अपहरण करून घेऊन जाताना रंगेहाथ पकडलेल्या ए पी आय शिंदे यांच्याकडे असलेली गाडी ही स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच अर्थ बलात्कार प्रकरणात फरार होण्यासाठी त्या अधिकाऱ्यांला बीड पोलिसांचे सहकार्य होते हे स्पष्ट झाले आहे.
बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकात दोन दिवसापूर्वी एक पोलीस कर्मचारी एका विवाहित महिलेस गाडीत (mh – 23,3204 )बसवून घेऊन जात असताना त्या महिलेच्या पतीने पोलिसांची गाडी अडवून त्याला बेदम मारहाण केली.
स्थानिक. गुन्हे शाखा किंवा क्राईम ब्रँच ही किचकट गुन्हे उघडकीस आणण्यासाठी म्हणून स्थापन करण्यात आलेली ब्रँच आहे, मात्र तेथील पोलीस कर्मचारी हेच जर फरार असलेल्या आरोपीला आपली चारचाकी वापरण्यास देणार असतील तर गुन्हेगारांवर वचक कसा राहणार. स्थगुषा चे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं आहे कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
यानंतर हे प्रकरण शिवाजीनगर पोलिसात गेलं, मात्र पोलिसांनी रेकॉर्ड वर फरार असणाऱ्या रवींद्र शिंदे यास अटक करण्याऐवजी सोडून दिले.
विशेष बाब म्हणजे ए पी आय रवींद्र शिंदे हे ज्या गाडीतून जात असताना त्यांना मारण्यात आले ती गाडी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जर पोलीस कर्मचारीच एखाद्या फरार आरोपीला सहकार्य करणारं असतील आणि आपली गाडी वापरण्यास देणार असतील तर आरोपीला मदत केली म्हणून त्या एल सी बी च्या पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.












Leave a Reply