सावरगाव -भगवान भक्तिगड येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच झापले. तुम्ही असं वागणार असाल तर मला कठोर व्हावे लागेल. हुल्लडबाजी करणारे माझे लोक असू शकतं नाहीत. अगोदर भगवान गडावरील माझा मेळावा हिरावून घेतला. आता येथील मेळावा देखील तुम्हाला बंद पाडायचा का असा सवाल करते मुंडे यांनी कार्यकर्त्यांना समज दिली.
सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे, महादेव जानकर, प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला, आता हा मेळावाही तुमच्या हातून हिरावला जाणार का?” असा थेट सवाल करत त्यांनी आपली भीती आणि नाराजी व्यक्त केली. “माझ्या मेळाव्यात संपूर्ण राज्यातून लोक येतात. मी कुणालाही बोलावले नाही, तुम्ही स्वतः आला आहात. मग अशा वेळी गैरवर्तन का? तुम्ही माझी माणसं नाही.” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
“हा फाटक्या माणसाचा मेळावा आहे!”
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात सांगितलं, “तुमचं भगवान बाबांवर खरं प्रेम असेल, तर असं वागणं अपेक्षित नाही. हा शोभेचा मेळावा नाही हा फाटक्या माणसांचा, संघर्ष करणाऱ्यांचा आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जपणाऱ्यांचा मेळावा आहे.” शायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लड़ने की…” अशा शायरीद्वारे त्यांनी आपल्या संघर्षशील प्रवासाची आठवण करून दिली.
पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यावर विश्वास
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांची अवस्था पाहून वेदना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने शब्द देते शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. पूर्ण मदत केली जाईल.”
जातीपातीवर मात, माणुसकीचा धागा
पंकजा मुंडेंनी विविध समाजातील लोकांच्या घरांमध्ये जाऊन केलेली मदत उधृत करत सांगितलं, “मी बौद्ध समाजातील व्यक्तीकडे गेले, तर वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजालाही मदत केली यातून जाती गळून पडत आहेत. माणुसकीचं नातं जुळतंय.”
भगवान बाबांचा संदेश, स्वाभिमानाने जगा
भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचा दाखला देत सांगितलं, “दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा. कुणाचे तुकडे उचलू नका. खोटे धंदे करू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतं. भगवान बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.”












Leave a Reply