अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर कोट्यावधी उधळले!
बीड – बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थान असो कि कार्यालय दुरुस्ती असो या नावाखाली कोट्यावधी रुपये कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंता यांनी घशात घातले आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी जो मलिदा लाटला आहे त्याची तक्रार दादांकडे करण्यात आली आहे.
बीड जिल्हा हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो गुंडगिरी असो दादागिरी असो वाळू माफी असो की लँड माफिया या कारणामुळे बीडची जेवढी बदनामी झाली आहे तेवढीच बदनामी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे देखील झाली आहे.
या सगळ्या प्रकारामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्री असलेल्या एका मंत्र्याच्या बीड जिल्यातील लाडक्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे त्यांचे तत्कालीन पीए गौंड उपअभियंता चंद्रकांत बोराडे शाखा अभियंता ठाकूर आणि गव्हाणे या लोकांनी बीडच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाची दुरुस्ती आणि निवासस्थानांची दुरुस्ती यावर कोट्यावधी रुपयांची उधळण करत हे पैसे स्वतःच्या आणि गुत्तेदाराच्या खिशात घातले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक कामे कागदावर दाखवून करोडो रुपये उचलले आहेत विशेष बाब म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणारे अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा करोडो रुपयांची बिले बोगस कामे दाखवून उचलण्यात आलेली आहेत या सर्व प्रकरणाची तक्रार अजित पवार यांच्याकडे झालेली असून जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.












Leave a Reply