News & View

ताज्या घडामोडी

images 2024 06 29T003623.091 1

तिघांना एकत्र बसवा अन एकच उमेदवार ठरवा -खांडे!

बीड – क्षीरसागर मुक्त बीड करायचे असेल तर मराठा समाजाच्या मतामध्ये होणारी फूट टाळावी लागेल, त्यासाठी अनिल जगताप, ज्योती मेटे आणि आपण स्वतः अशा तिन्ही उमेदवारांनी एकत्र बसावे अन चिठ्ठी टाकावी, ज्याची निघेल त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन बीड मतदारसंघातील छत्रपती संभाजीमहाराज यांचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी केले.

खांडे यांच्या प्रचारासाठी बीड येथे छत्रपती संभाजी महाराज यांची सभा झाली. यावेळी प्रस्ताविक करताना उमेदवार खांडे यांनी स्पष्ट केले कि, मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही.

काही समन्व्यक म्हणजे जरांगे पाटील नाहीत अन टी संपूर्ण समाजाची भावना नाहीये. समाजातील एकाला निवडून जायचे असेल तर तिघांनी एकत्र बसणे आवश्यक आहे. सर्वांनी चिठ्ठी टाकावी असे मात्र खांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *