News & View

ताज्या घडामोडी

पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!

बीड -बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड मतदार संघातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी एक सप्टेंबर रोजी नोकरीं भरती महोत्सव चे आयोजन केले आहे. यावेळी राज्यातील पन्नास पेक्षा अधिक कंपन्या बीडमध्ये येऊन ऑन दि स्पॉट नोकरीं देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली.

बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी या नोकरी भरती महोत्सवची भूमिका जाहीर केली.बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने  बीडमधील युवक युवतींसाठी दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते सायं 6.00 वाजेपर्यंत माँ  वैष्णव पॅलेस, बीड येथे  भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

• सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील 50 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

• शिक्षण आठवी ते उच्च शिक्षण आणि लाभार्थी पात्रता 18 ते 30 वयोगटापर्यंत असेल.

• मेळाव्यास उपस्थित प्रत्येक उमेद्वरास 100 % नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

• निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

• विविध नामांकित कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

•  मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि बायोडाटा असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *