News & View

ताज्या घडामोडी

images 2023 09 27T213813.514

आता थेट मंगळवारी सरकारी कार्यालय उघडणार !

मुंबई- गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने देणायत आलेली गुरुवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शुक्रवारी सुट्टी असेल,त्यामुळे सरकारी कार्यालये थेट मंगळवारी उघडतील.

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्य शासनाने गुरुवारची सुट्टी रद्द केल्याचे पत्रक बुधवारी दुपारी काढले,त्यामुळे अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी यांची तारांबळ उडाली.अनेकांनी गुरुवारपासून रजा दिली होती,मात्र आता एक दिवसासाठी त्यांना कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *