News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260905 WA0038

आयुर गायनॅक क्लिनिक चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा!

बीड -बीड शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या आयुर गायनॅक या आयुर्वेदिक क्लिनिक चा प्रथम वर्धापन दिन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि भाजपच्या गटनेत्या डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. अलीकडच्या काळात आयुर्वेदिक उपचारांना मोठे महत्व आले असल्याचे मतदान यावेळी डॉ सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केले. तर डॉ रसिका पारगावकर यांच्या पुढील वाटचालीस शंकर देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ रसिका पारगावकर यांनी मागील वर्षी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर बीड शहरातील अंबिका चौक भागात आयुर गायनॅक या स्त्री रोग चिकित्सलायची मान्यवरांच्या हस्ते सुरवात केली होती.

5 सप्टेंबर 2026 रोजी क्लिनिक चा प्रथम वर्धापन दिन आयोजित केला होता. या निमित्त सल्ला शुल्क 199 रुपये तर पंचकर्म पॅकेजवर 20% सवलत आणि सीबीसी, इ एस आर तसेच बी एस एल आणि थायरॉईड टेस्ट फक्त 599 रुपयात करण्याची सवलत 5 आणि 6 सप्टेंबर अशी दोन दिवस ठेवली आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ क्षीरसागर आणि देशमुख यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी बोलताना डॉ क्षीरसागर यांनी गर्भधारणा आणि स्त्री रोग यामध्ये अलीकडच्या काळात आयुर्वेदिक उपचारांना अनन्य साधारण महत्व आल्याचे सांगितले.
तसेच शंकर देशमुख यांनी आयुर्वेदिक उपचार ही जुनी उपचार पद्धत असून त्याचा रुग्णांना जुनाट आजारासाठी चांगला फायदा होतो असे सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे, भरत अण्णा लोळगे, प्रा. वासुदेव निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थितांचे स्वागत संतोष पारगावकर, डॉ रसिका पारगावकर, अशोक पारगावकर, सुभाष पारगावकर आणि सौ स्नेहा पारगावकर यांनी केले.

प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित योजनेचा लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन यावेळी डॉ रसिका पारगावकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *