News & View

ताज्या घडामोडी

20260614 145110 scaled

माताबाल संगोपन इमारत अपूर्ण!जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

बीड -जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आठ वर्षांपासून बांधकामं सुरु असलेली माता बाल संगोपन विभागाची इमारत अद्यापही पूर्ण झालेली नाही. रविवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाहणी करून एन आर एच एम चे उपअभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांना चांगलेच फैलावर घेत त्यांची खरडपट्टी काढली.

बीड जिल्हा रुग्णालय आवारात आठ वर्षांपूर्वी माता बाल संगोपन साठी शंभर खाटांची इमारत मंजूर झाली. या इमारतीचे काम परळी अंबाजोगाई भागातील गित्ते नावाच्या गुत्तेदाराला मिळाले. यासाठी तब्बल 21 कोटी रुपये निधी देखील मंजूर झाला.

मात्र आठ वर्ष झाले तरी इमारतीचे काम पूर्ण झाले नाही. वर्षभरापूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी याचा आढावा घेत तातडीने इमारत पूर्ण करण्याचे आदेश दिले. मात्र चार महिन्यापूर्वी अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर या इमारत बांधकामकडे कोणीच लक्ष दिले नाही.

महिनाभरपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढाव घेतला. त्यानंतर रविवारी पुन्हा जिल्हाधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. मात्र कामात प्रगती नसल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. जिल्हाधिकारी शल्य चिकित्सक डॉ सोळंके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पाहणी केली.

यावेळी तेथे उपस्थित असलेले उपअभियंता राऊत यांना इमारत अपूर्ण का आहे, काम संथ गतीने का सुरु आहे याबद्दल समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. त्यामुळे जॉन्सन यांनी राऊत यांच्यासह गुत्तेदार गित्ते आणि पटेल यांच्या माणसांना चांगलेच झापले.

जिल्हाधिकारी पाहणीसाठी येणार हे माहित असून देखील गुत्तेदार गित्ते, पटेल आणि एन आर एच एम चे कार्यकारी अभियंता गैरहजर होते. याबद्दल देखील जॉन्सन यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *