News & View

ताज्या घडामोडी

20260607 130550 scaled

रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!

बीड – बीड नगरपालिकेच्या वतीने शहरातील 15 ते 20 रस्त्यांच्या कामासाठी 22 कोटी पेक्षा अधिकचा निधी मंजूर झाला आहे उशिरा का होईना या रस्त्यांची कामे सुरू होण्याची चिन्हे आहेत मात्र स्टेडियम चा भाग असो किंवा राजूरी वेस्, बलभीम चौक अथवा जिजामाता चौक ते पॅराडाईज हॉस्पिटल या रस्त्यांवरील मार्क आउट बदलून काही धनिकांपुढे नगरपालिका प्रशासन आणि गुत्तेदार लोटांगण घालत असल्याचे चित्र आहे बीड नगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनावर वर चष्मा गाजवणाऱ्या आमदार विजयसिंह पंडित यांनी मारकौट बदलणाऱ्यांवर कारवाई करत अतिक्रमणे देखील काढावीत अशी मागणी होत आहे.

बीड शहरातील बशीर गंज ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळी वेस जिजामाता चौक ते पॅराडाईज हॉस्पिटल समोरील रस्ता, सांगली बँक कॉर्नर ते प्रेस लाईन मार्गे जालना रोड अशा जवळपास 20 ते 22 रस्त्यांना अजित पवार पालकमंत्री असताना मंजुरी मिळाली होती मात्र त्यानंतर नगरपालिकेचे आचारसंहिता आणि इतर कारणामुळे ही कामे सुरू होऊ शकली नाहीत.

या सर्व कामांचे टेंडर निघाल्यानंतर गुत्तेदार असलेल्या कन्स्ट्रक्शन च्या वतीने सत्ताधारी 27 नगरसेवकांना दुचाकी वाहनांचे गिफ्ट देण्यात आले आणि 22 कोटीचे टेंडर मंजूर करून घेण्यात आले त्यानंतर दीड महिना होऊ नये हे काम न सुरू झाल्याने जनतेतून ओरड होऊ लागली.

20260607 1304375627204524086574242
फोटोत दिसणारी पांढरी लाईन अगोदर तीन पायऱ्या पर्यंत वर होती, मात्र एका स्वीकृत नगरसेवकांच्या मध्यस्थी नंतर आ पंडित यांनी या मार्क आउट बदलाला मान्यता दिल्याची चर्चा आहे.

याची दखल घेत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चार दिवसांपूर्वी स्टेडियम परिसर आणि इतर रस्त्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा शुभारंभ करण्याचे आदेश दिले त्यांच्यासमोर संबंधित गुत्तेदार आणि नगरपालिका प्रशासनाने मार्क आउट देखील टाकले त्यामुळे येथे कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार अशी आशा निर्माण झाली होती.

बीड शहरात जेवढे रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत त्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न देखील गंभीर आहे रहिवासी भागात हे रस्ते होणार असल्यामुळे अनेकांच्या घराच्या पायऱ्या सज्जे गॅलरी यापुढे आलेले आहेत तसेच अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे हे अतिक्रमण काढूनच रस्त्याचे काम करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

दरम्यान आमदार पंडित यांच्या उपस्थितीत टाकलेले मार्क आउट रात्रीतून बदलून काही धनिक लोकांच्या समोर संबंधित गुत्तेदार आणि नगरपालिका प्रशासनाने लोटांगण घातले आहे. स्टेडियम परिसरात असलेल्या दीनदयाळ बँकेच्या बाजूने जे मार्क टाकले होते ते अचानक बदलण्यात आले त्यासाठी एका स्वीकृत नगरसेवकाने आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे वशिला लावला आणि संबंधित गाळेधारकाला लाभ मिळवून दिला अशी चर्चा आहे.

आमदार पंडित यांनी बीड शहराच्या विकासाचा वसा घेतला असला तरी मार्क आउट बदलण्याचा जो काही प्रकार झाला आहे त्याकडे स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा प्रत्येक जण आपल्या घरासमोर नाली नको आपल्या अतिरिक्त बांधकाम तोडायला नको अशा पद्धतीने वागेल आणि रस्ते लहान होतील याकडे आमदार पंडित यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *