News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल द्वितीया
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १८ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १८ मे २०२६‼️

मेष:- चंद्राचा बुधाशी केंद्र योग्य आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. संयम ठेवा. पाळीव पशूंपासून काळजी घ्या. वाहन दुरुस्ती संभवते.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. प्रेमत अपयश संभवते. लेखक, प्रकाशक यांना अडचणींना सामोरे जावे बाळगू शकते.

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी चालून येतील. भेटवस्तू मिळतील. शब्द वापरताना काळजी घ्या.

कर्क:- दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. भ्रमंती होईल. क्रोधास आवरावे लागेल.

सिंह:- दूरचे प्रवास होतील. मात्र प्रवासाचे नियोजन काटेकोर करा. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील. संध्याकाळ आनंदाची.

कन्या:- संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. दुपारनंतर अनुकूलता कमी असणार आहे. योग्य निर्णय घ्या.

तुळ:- आज कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडतील. ग्राहकांशी संवाद साधतांना काळजी घ्या. गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. शत्रूला कमी लेखू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा.

धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. गुप्तमाहितीची वाच्यता करू नका.

मकर:- मन उत्साही राहील. मात्र शत्रूचा त्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल. चोरीचे भय आहे. अनोळखी इसमावर विसंबून राहू नका.

कुंभ:- मन आनंदी राहील. मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दिचे कारण. कार्यसाध्दि होईल, व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. ओळखीतून कामे होतील.

मीन:- कुटुंबात आनंद असेल. मित्र पाहूणे येवू शकतात. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. घरात विशेष लक्ष द्यावे लागेल. कामावर वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. ओळखीतून कामे होतील. काम करणारे फक्त ओळख न पाहता लोभाने कार्य करतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *