News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण सप्तमी / महाराणा प्रताप जयंती ( तारखेप्रमाणे )
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०९ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०९ मे २०२६‼️

मेष
आज
आज तुमचे विचार स्पष्ट राहतील. कामात नवीन कल्पना मांडण्यास योग्य वेळ आहे. वरिष्ठांकडून समर्थन मिळेल. नातेसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा.दूरचे प्रवास ठरतील.

वृषभ
आज
आर्थिक गोष्टी चे चांगले नियोजन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.

मिथुन
आज
चंद्र–बुध योगामुळे तुमची संवादशैली प्रभावी राहील. नवीन करार किंवा चर्चा यशस्वी होऊ शकतात. मित्रांकडून मदत मिळेल.बुधाच्या प्रभावामुळे नवीन गोष्टी पटकन समजतील. भाषा, लेखन, कम्युनिकेशन, कॉमर्स किंवा आयटी विषयात विशेष प्रगती दिसेल.

कर्क
आज
कामात जबाबदाऱ्या वाढू शकतात. धावपळ होईल.थोडा ताण जाणवेल पण संयम ठेवल्यास सर्व व्यवस्थित पार पडेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह
आज
आज सर्जनशीलतेला वाव मिळेल. कला, लेखन किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.

कन्या
आज
घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राखा.वाहन सौख्याचा दिवस.बुधाच्या प्रभावामुळे तुम्हाला वाचलेले पटकन समजेल. विशेषतः गणित, विज्ञान, अकाउंट्स किंवा लॉजिकल विषयांमध्ये प्रगती होईल.

तुळ
आज
प्रवास किंवा नवीन लोकांशी संपर्क वाढेल. संवादातून फायदेशीर संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल.सोशल मीडियावर टिप्पणी प्रसिद्धी देईल.

वृश्चिक
आज
आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आत्मविश्वासाने काम करा.बोलण्यातून लाभ घडेल.

धनु
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज तुमचा दिवस प्रभावी राहील. नवीन सुरुवात, निर्णय आणि स्वतःसाठी वेळ देण्यास योग्य वेळ आहे.प्रवासाचे योग. नवीन गॅझेट खरेदी ची शक्यता.

मकर
आज
आज थोडा एकांत हवा वाटेल. मनातील विचार समजून घेण्यासाठी वेळ द्या. ध्यान किंवा योग फायदेशीर ठरेल.

कुंभ
आज
सवंगडी आणि सोशल नेटवर्किंगमुळे नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मीन
आज
करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *