सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल पोर्णिमा / महाराष्ट्र दिन / बुद्ध पौर्णिमा / आंतरराष्ट्रीय कामगार दिन / मराठी राजभाषा दिन / पौर्णिमा समाप्ती रात्री १०/५२
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०१ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०१ मे २०२६‼️
मेष:- आत्मविश्वासपूर्वक कार्य कराल. नवीन कामात यश मिळेल. नियोजन योग्य झाल्याने कामामध्ये चांगली प्रगती साधेल.
वृषभ:- पूर्व संकल्पित कामांना गती मिळेल. आर्थिक बाबतीत कामे होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र नातेवाईक भेटी गाठी होतील.
मिथुन:- व्यवहारीपणाने संवादातून नवीन संधी प्राप्त होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबीक जीवन चांगले असेल. छोटे प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क:- आत्मविश्वास वाढेल. कामातील नियोजन व निर्णय योग्य ठरतील. दुसर्यांकडून कार्य करून घेवू शकाल. उत्साहवर्धक दिवस आहे.
सिंह:- नविन काम जबाबदारीने कराल. कामातून प्रतिष्ठा आणि मान वाढेल. नवीन ओळखीतून संबंध चांगले प्रस्थापित होतील.
कन्या:- चांगले विचार व कामातील दक्षता यामुळे कामात स्थैर्य राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
तुळ:- मित्र सहकारी मदत करतील. संबंधांमध्ये तणाव कमी होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक:- नियोजनानुसार
प्रगतीपथावर राहाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल, सहकार्य मिळेल. आर्थिक कामे होतील.
धनु:- नियोजित कामामध्ये सफलता मिळेल. भाग्याची साथ लाभेल. नविन कामाच्या संधी मिळतील. प्रवास कार्यसाधक होतील.
मकर:- चांगला दिवस आहे. आर्थिक व्यवहारात सावधानता पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या स्वभावाचा गैरफारदा घेणार नाहीत यासाठी संयमाने निर्णय घ्या.
कुंभ:- भागीदारीत संबंधात सुधारणा होईल नविन कामामध्ये यश मिळेल. मतभेद कमी झाल्याने संबंध मजबूत होतील.
मीन:- कामाची व्याप्ती वाढेल. नविन योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. अवश्यक तेथे तज्ञांचा सल्ला उपयोगी असेल.





Leave a Reply