News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल द्वादशी
🌸 नक्षत्र…. उ. फाल्गुनी
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २८ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २८ एप्रिल २०२६‼️

मेष
आज
आज सकाळपर्यंत कामे वेगाने होतील, पण दुपारनंतर घर-परिवाराकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ
आज
आज आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. एखादा अडकलेला पैसा मिळू शकतो. दुपारनंतर प्रवास, नातेवाईकांशी बोलणे किंवा नवीन योजना सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. सौंदर्य, कपडे, घरसजावटीसाठी खर्च होईल.

मिथुन
आज
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सकाळी आत्मविश्वास आणि उत्साह राहील. दुपार नंतर पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक कारणास्तव खर्च कराल.नात्यांमध्ये प्रेम वाढेल. अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते.

कर्क
आज
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्यामुळे दिवसाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप चांगला राहील. मन प्रसन्न राहील, चेहऱ्यावर तेज दिसेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करायला योग्य वेळ.

सिंह
आज
आज थोडा शांत राहण्याचा दिवस आहे. सकाळी मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. दुपारनंतर मनात गोंधळ किंवा जुन्या गोष्टींची चिंता राहू शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यान, प्रार्थना लाभदायक ठरेल.तरीही आर्थिक दृष्टीने चांगला.

कन्या
आज दशम आणि लाभ स्थानी चन्द्र आहे.
आज नोकरी, व्यवसाय किंवा सामाजिक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. आज नवीन ओळखींचा फायदा होईल. दुपारनंतर मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. एखादा नवीन प्लॅन किंवा कार्यक्रम ठरू शकतो.मनपसंत गोष्टी घडतील.

तुळ
आज
आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. सकाळी प्रवास, शिक्षण किंवा कागदपत्रांच्या कामात यश मिळेल. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. महिलांनी स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवावा.

वृश्चिक
आज अचानक फायदा किंवा नवीन संधी मिळू शकते. चंद्राचा शुक्राशी लाभयोग असल्यामुळे जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीकडून साथ मिळेल. दुपारनंतर दूरच्या प्रवासाचे, शिक्षणाचे किंवा नवीन कामाचे विचार पुढे जातील.

धनु
आज
आज नातेसंबंध आणि भागीदारीच्या गोष्टींना महत्त्व आहे. सकाळी एखादा वाद टाळा. दुपारनंतर आर्थिक लाभ, भेटवस्तू किंवा अचानक फायदा होऊ शकतो. आज आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर
आज
आज कामाचा ताण जास्त राहू शकतो, पण त्यातून फायदा मिळेल. सकाळी आरोग्याकडे लक्ष द्या. दुपारनंतर जोडीदार, कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तीसोबत वेळ छान जाईल. प्रेमात यश.

कुंभ
आज
आज सर्जनशीलता आणि आनंदाचा दिवस आहे. मुलांशी संबंधित कामात यश मिळेल. आज नव- नवीन कल्पना सुचतील. दुपारनंतर कामाचा व्याप वाढेल, पण त्यातून चांगला फायदा होईल. सौंदर्य, कला, लेखन क्षेत्रात यश.

मीन
आज
आज घर, कुटुंब आणि मन:शांती यांना महत्त्व द्यावे. सकाळी घरातील कामे किंवा जबाबदाऱ्या वाढतील.घर सजावटीसाठी खर्च कराल. दुपारनंतर प्रेम, आनंद, विरंगुळा आणि आवडीच्या गोष्टींसाठी चांगला वेळ आहे. महिलांना मनासारखी बातमी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *