सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल मोहिनी एकादशी
🌸 नक्षत्र…. पूर्वा फाल्गुनी
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २७ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २७ एप्रिल २०२६‼️
मेष
आज
आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि धाडस यांना मान्यता मिळेल. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा. घरात एखाद्या स्त्री सदस्याशी गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
आज
कुटुंब आणि पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. जुन्या अडचणींवर मार्ग सापडेल. एखादे अडकलेले काम पूर्ण होईल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नये.
मिथुन
आज तुमच्याच राशीत होणारी
चंद्र आणि गुरूची युती तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तुमचा प्रभाव वाढेल, लोक तुमचे म्हणणे ऐकतील. नवीन काम, मुलाखत किंवा नात्यात पुढाकार घेतल्यास यश मिळू शकते. आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा राहील.
कर्क
आज
मनात थोडी चिंता किंवा गोंधळ राहू शकतो. मात्र शांत राहून विचार केल्यास योग्य निर्णय मिळेल. गुप्त शत्रू किंवा मागून बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. अध्यात्म, प्रार्थना किंवा ध्यान यामुळे मन शांत राहील.
सिंह
आज
मैत्री, सामाजिक संबंध आणि नवीन संपर्क यामुळे फायदा होईल. एखादा मित्र मैत्रीण किंवा सहकारी मदतीला येईल. आर्थिक लाभ किंवा नवीन संधी मिळू शकते. संध्याकाळी आनंदाचा क्षण अनुभवता येईल.
कन्या
आज
कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल. वरिष्ठ किंवा कुटुंबातील वडीलधारी व्यक्तीकडून कौतुक मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. आज जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच प्रगती होईल.
तुळ
आज
प्रवास, शिक्षण, धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये रुची वाढेल. नवीन शिकण्याचा किंवा पुढील योजना आखण्याचा दिवस आहे. एखादी शुभ बातमी दूरच्या व्यक्तीकडून मिळू शकते.
वृश्चिक
आज
आज आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. जोडीदाराशी किंवा कुटुंबाशी संबंधित विषयात संयम बाळगा. अचानक खर्च किंवा भावनिक ताण येऊ शकतो, पण योग्य संवादामुळे परिस्थिती सुधारेल.
धनु
आज
वैवाहिक आणि नातेसंबंधाच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी चर्चा करून मोठा निर्णय घेऊ शकता. आज नवीन ओळख किंवा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
मकर
आज रोजच्या कामांमध्ये धावपळ वाढेल, पण त्यातून समाधानही मिळेल. आरोग्य आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी एखादी जुनी समस्या सुटू शकते.
कुंभ
आज रोमॅंटिक दिवस ,प्रेमात यश.आणि मुलांशी संबंधित विषयांमध्ये आनंद मिळेल. महिलांनी स्वतःच्या आवडीसाठी वेळ द्यावा. नवीन कल्पना आणि योजना पुढे नेण्यासाठी दिवस उत्तम आहे.
मीन
आज घर, कुटुंब आणि भावनिक बाबींना प्राधान्य द्यावे लागेल. घरात काही बदल, सजावट किंवा कौटुंबिक चर्चा होऊ शकते. आई किंवा वडीलधाऱ्या स्त्रीकडून मार्गदर्शन मिळेल. मनातला ताण कमी होईल.





Leave a Reply