सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल विनायक चतुर्थी/ जागतिक मातृभाषा दिन
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २१ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक २१ फेब्रुवारी २०२६‼️
मेष: कामामध्ये घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक चंचलता जाणवेल. अध्यात्मिक चिंतन उपासना लाभदायक होईल.
वृषभ: आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. परिवारीक जीवनात
कुटुंबीयांच्या मतांचा आदर करा. वडिलधारी मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.
मिथुन: कामाचे योग्य नियोजन करा. चांगला दिवस आहे. चर्चेतून संवादातून भागीदारीच्या कामात यश मिळेल. आपल्या कामामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कर्क: पुढील माणसांचे मत समजून घ्या. मतभेद होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार वाढवा. तणावातून मुक्तीसाठी उपासना करा. धार्मिक कार्यात मन रमेल.
सिंह: चांगला दिवस आहे. अध्ययनासाठी अनुकूल दिवस आहे. शुभ बातमी मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. मनाच्या प्रसन्नतेसाठी ध्यान धारणा प्राणायाम करावा.
कन्या: उर्जावान दिवस आहे. नविन जबाबदाऱ्या वाढतील. कामामध्ये कुशलतेने कार्य संपादन होईल. मनःशांती मिळेल. आर्थिक कामे होतील.
तुळ: कार्यसाधक भेटीगाठी होतील नियोजित कार्यामध्ये लाभ होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. अडचणीतून मार्ग सापडेल.
वृश्चिक: नियोजित कामामध्ये गती मिळेल. आर्थिक लाभ होतील लाभाबरोबर खर्च वाढेल. मन प्रसन्न राहील. उपासना करावी.
धनु: आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासपूर्वक कार्य साधल्याने चांगले यश मिळेल. नवीन विचार आकार घेतील. मानसिक उन्नती साधेल.
मकर: मनाची चंचलता असेल. भेटीगाठी संवादासाठी आजचा दिवस योग्य. सकारात्मक विचाराने अंतर्मनातील गोंधळ कमी होईल.
कुंभ: घाई करू नका. आपल्या कामाचे क्षेत्र व्यापक होईल. मित्रांकडून भागिदारांकडून मदत होईल. आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल. ध्यान प्राणायाम करा.
मीन: उपासना करा. नियोजित कामामध्ये प्रगती होईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. मित्रांपासून लाभ होतील. आर्थिक कामे होतील.












Leave a Reply