News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

तीन बोगस शिक्षकांना अटक!

बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोन शिक्षणाधिकारी यांना अटक झाल्यानंतर एस आय टी ने शुक्रवारी तीन शिक्षकांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर शिक्षक घोटाळ्याची व्याप्ती पाहता राज्यभरात एस आय टी चौकशीत हजारो बोगस शिक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे.


सतीश विजय पवार (वय ३४, रा. दिग्रस, यवतमाळ, हल्ली मुक्कास शाहुनगर, मानेवाडा), प्रज्ञा विरेंद्र मुळे (वय ३८, रा. सुर्योदयनगर, म्हाळगीनगर), भूमिका सोपान नखाते (वय ३९, रा. सर्वश्रीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
सतीश पवार आणि प्रज्ञा मुळे हे दोघेही मानेवाडा येथील विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळा तर भूमिका नखाते या बोरगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी विद्याभूषण शाळेतील मुख्याध्यापकांना अटक झाली होती. दरम्यान या तिन्ही शिक्षकांची नियुक्ती झाली.


त्यानंतर सतीश पवार यांनी बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून एक ऑगस्ट २०२३ तर प्रज्ञा मुळे आणि भूमिका नखाते यांनी जून २०२४ पासून वेतनाची उचल केल्याची माहिती तपासात उघडकीस आली. त्यामुळे सायबर पोलिसांनी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले होते. चौकशीत त्यांची कागदपत्रे तपासल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. यामध्ये आणखी एका शिक्षकांचा समावेश होता. मात्र, त्याच्याकडे आढळलेली कागदपत्रे योग्य असल्याने त्याला सोडण्यात आले. विशेष म्हणजे, बुधवारी एसआयटीने दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली. त्यामध्ये दोघांनीही ३९८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव असताना, त्यांचे वेतन काढल्याचे समोर आले होते.



प्राथमिक शिक्षणाधिकारी काळुसे यांनी १५ मार्च २०२४ या दरम्यान तब्बल १५४ शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार झाले नसताना त्यांचे पगार काढण्याची प्रक्रिया केली. याशिवाय रोहिणी कुंभार यांनी २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या दरम्यान २४४ शिक्षकांचे प्रस्ताव बोगस असताना, त्यांचा पगार काढला. या सर्वच शिक्षकांच्या प्रस्तावाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *