News & View

ताज्या घडामोडी

पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!

नवी दिल्ली- उत्तरप्रदेश सहित पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे तर चार जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत.प्रतिष्ठेची घोसी ची जागा समाजवादी पक्षाने जिंकत भाजपला धक्का दिला आहे.

घोसीमध्ये सपाला 74946, भाजपाला 49813 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु असून लवकरच निकालही जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये डुमरी पोटनिवडणुकीत झामुमोने दणदणीत विजय मिळवला आहे. बेबी देवी यांनी एनडीएच्या यशोदा देवी यांचा 15 हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभेची जागा भाजपने जिंकली आहे. भाजपच्या उमेदवार पार्वती दास यांनी काँग्रेसच्या बसंत कुमार यांच्यापेक्षा २,७२६ मते जास्त मिळविली आहेत. काँग्रेसने केरळमध्ये पुथुपल्लीमध्ये विजय मिळविला आहे. बंगालच्या धुपगुरी जागेवर टीएमसीचा उमेदवार विजयी झाला आहे. टीएमसीचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांनी 4,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. भाजपाने त्यांच्याविरोधात शहीद सीआरपीएफ जवानाची पत्नी तापसी रॉय यांना उतरविले होते.

त्रिपुराच्या बॉक्सानगर जागेवर भाजपने 34146 मतांनी मोठा विजय मिळविला आहे. धनपूरमध्ये भाजपाने पहिला विजय नोंदवत खाते उघडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *