News & View

ताज्या घडामोडी

तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!

बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM – 7094) या क्रमांकाची दुचाकीही सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. नेमकी तरुणाची हत्या कोणी केली ? हत्येचे कारण काय ? याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

बीड शहरात या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरापासून काही अंतरावर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *