सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल द्वितीया / जरा जिवतीका पूजन
🌸 नक्षत्र…. पूर्वा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १४ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक १४आँगस्ट २०२६‼️
मेष:- चांगला दिवस आहे. अनुकूल ग्रहमान आहे. उत्साहाने कामाला लागा. कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्वाचे कार्य संपन्न होईल. मनाला काहीतरी चिंता निर्माण होईल. सकारात्मक विचाराने त्यावर मात कराल.
वृषभ:- विचारपूर्वक संवाद साधा, आपल्या शब्दाला किंमत येईल. भागिदार जोडीदार यांच्याशी व्यवहारिक बाबी साध्य करता येतील. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात समन्वयाची भूमिका घ्याल.
मिथुन:- कौटुंबिक प्रश्नावर लक्ष द्यावे लागेल. मन प्रसन्न ठेवा. आत्मविश्वासाने कार्य केल्यास कामात व्यवसायात भरभराट होईल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
कर्क:- सरकारी कामामध्ये कौटुंबिक कामामध्ये लाभ होतील. वरिष्ठांशी भेटीगाठी यशस्वी होतील. परिवारासोबत वेळ व्यतीत कराल. नविन गोष्टींवर चिंतन होईल.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. प्रयत्न वाढवा सरकार दरबारी वजन वाढेल. मात्र कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. कदाचित चुकीची माहिती मिळू शकते. व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
कन्या:- अनावश्यक खर्च वाढू शकतात. कौटुंबिक जीवन चांगले. नातेसंबंध सुधारतील. विचारपूर्वक निर्णय करा. कधी तटस्थ राहण्याचा मार्ग स्विकारावा लागतो. वेळ पाहून निर्णय घ्या.
तुळ:- मनातून आलेला अंतरात्म्याचा अवाज ओळखा. सखोल आणि शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास मार्ग सापडेल. आर्थिक आवक चांगली राहील. अनपेक्षितपणे काही कार्ये सिध्द होतील. आर्थिक कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- आरोग्यात सुधारणा होईल. पथ्यपाणी पाळा तुमच्या बुद्धीचा आणि अधिकाराचा योग्य वापर होईल. आपण घेतलेला निर्णय योग्य असेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
धनु:- मनाची घालमेल कमी होईल. नविन मार्ग सापडतील. शत्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक जीवनातील मतभेद कमी होतील. राजकीय कामे पुढे सरकतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.
मकर:- मन चंचल होईल. आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष द्या. कामामध्ये दिरंगाई झाली व काही गोष्टी मनाविरुध्द झाल्या तरी अंतिमतः यश तुम्हालाच मिळेल.
कुंभ:- हुशारीने कार्य संपादन करा. मनातील आळस दूर करा. सकारात्मकतेने कार्य करावे. कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. गैरसमज टाळा. खर्चात वाढ होऊ शकते. आर्थिक कामे होतील.
मीन:- जीवनातील आदर्श हरवू नका. चढ उतारांना न डगमगता कार्य करा. बलवान शत्रूचा त्रास होऊ शकतो. आपणही समर्थपणे त्यावर मात करू शकतो हा आत्मविश्वास ठेवा.





Leave a Reply