News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल पंचमी
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १९ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १९ जुन २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. एखादा संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल.

वृषभ:- मनाप्रमाणे कार्य होण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक कामे मार्गी लागतील. प्रगती साधता येईल. भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी फायदा करून घ्या.

मिथुन:- धन स्थानातील चंद्र सकारात्मक विचारसरणीने स्वत:ला उत्तेजन द्या. तुमच्याकडे आवडत्या कामासाठी पर्याप्त वेळ असेल. कामामध्ये प्रगती साधेल.

कर्क:- केल्याने होत आहे रे !अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात.आज तुमचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

सिंह:- मनाची घालमेल होईल काही क्षणासाठी उदासिनता जाणवेल. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या उपक्रमात स्वत:ला गुंतवाल चांगली वेळ आहे. आजच्या दिवशी स्वत:कडे सकारात्मकपणे पाहा.

कन्या:- लाभातील चंद्र सकारात्मक विचार वाढवा. वडिलधारींचा सल्ला आज लाभ करवून देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना मदत करा. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही – या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात.

तुळ:- उत्साहाने कामाला सुरुवात करा. आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. मनात शांती असेल. सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. त्यामुळे मनस्वस्थता वाटेल.

वृश्चिक:-रिकाम्या वेळात काही विशेष कार्य करण्याचा प्रयत्न करा. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक लाभ मिळू शकेल.

धनु:- तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. कार्यांरंभासाठी चांगला दिवस असेल. मित्र सहकारी यांची मदत होईल.

मकर:- कामाचा डोंगर असला तरी सहज कार्यपूर्ती कराल. उद्योजकता यश मिळवून देईल. वडिलधार्‍यांचे विचार जाणून घ्या. तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून आनंदी राहणे पसंत असते.

कुंभ:-अनावश्यक ताण घेऊ नका. योगासने प्राणायाम करणे शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असेल. व्यक्तिमत्व सुधारण्याचे केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
आर्थिक कामे होतील.

मीन:- संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. नियोजित कामामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगला दिवस आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशिर्वाद मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *