सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण तृतीया / संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०९/५२मि.
🌸 नक्षत्र…. पु. षाढा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०३ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️ ‼️ दिनांक ०३ जून २०२६‼️
मेष:- मनाची चलबिचल असेल. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. आज अचानक घडामोडी घडतील. आर्थिक बाबतीत सावधानतापूर्वक व्यवहार करावेत. दुसर्यांवर जास्त विश्वासून राहू नका.
वृषभ:- नात्यामध्ये काही मतभेद संभवतात काही गैरसमज होऊ शकतात. समजूतदारपणे संयमाने कार्य करणे आवश्यक आहे. संवादातून गैरसमज निर्माणहोणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
मिथुन:- जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा ताण वाढेल. घाईतील कामामुळे काही त्रुटी होतील. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. उपासना ध्यान लाभदायक ठरेल.
कर्क:- आनंदी दिवस आहे. कलाक्षेत्रात प्रगती साधेल. मित्र सहकारी यांच्याकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सकारात्मक वातावरण राहील. आर्थिक कामे हैतील.
सिंह:- मानसिक चंचलतेमुळे मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. आर्थिक लाभ होतील. भेटीगाठीतून समाधान लाभेल.
कन्या:- चांगला दिवस आहे. कामामध्ये नविन संधी प्राप्त होतील. निर्णयक्षमता यशस्वी राहील. मित्र सहकारी मदत करतील तरीही व्यवहारात दक्षता राखावी.
तुळ:- सुसंवाद व सकारात्मक विचार वाढवा. व्यवहारात संयम आवश्यक आहे. अचानक खर्च उद्भवू शकतो. अनावश्यक खर्च व चर्चा टाळावी.
वृश्चिक:- उत्साह व आत्मविश्वास वाढलेला असेल. अहंला दूर ठेवा महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तज्ञांचा सल्ला उपयोगी ठरेल.
धनु:- नकारात्म विचार अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार वाढवा शांत राहण्याचा प्रयत्न करा. हितशत्रूपासून त्रास संभवतो.
मकर:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. नात्यातील मतभेद कमी करण्यासाठी संवाद वाढवा. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून मदत मिळेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. सामाजिक कार्यात यश मिळवाल प्रतिष्ठा सन्मान वाढेल.
कुंभ:- आपल्या कौशल्यपूर्ण कामामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य कमी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. चांगले यश मिळेल.
मीन:- चांगला दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. सगेसोयरे आपल्या मताला प्राधान्य देतील. कामामध्ये मेहनत होईल परंतु यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.





Leave a Reply