गेवराई – तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्म गाव येथे मारुतीच्या मंदिरात असलेल्या मूर्तीला अज्ञात लोकांनी मटन चिकटवून विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मगाव येथे मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात असलेल्या मूर्तीला अज्ञात लोकांनी मटन चिकटवून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार गुरुवारी पहाटे लक्षात आल्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या गंभीर प्रकरणाची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मात्र ग्रामस्थांनी ज्या दोन लोकांवर संशय व्यक्त केला आहे त्यांच्याविरुद्ध अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारी सकाळी नऊ वाजता या मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.





Leave a Reply