सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण द्वितीया
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०४ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०४ एप्रिल २०२६‼️
मेष
आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
कामावर लक्ष केंद्रित कराल. छोट्या गोष्टींवर जास्त विचार करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
आज पंचम स्थानी चन्द्र आहे.
सर्जनशीलता वाढेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. मुलांशी संबंधित आनंद मिळेल.
मिथुन
आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
घरगुती गोष्टींमध्ये व्यस्त राहाल. मन थोडं संवेदनशील राहील. शांतता राखा.घर आणि नोकरीत योग्य समतोल राखा.
कर्क
आज तृतीय स्थानी चन्द्र आहे.
संवादातून कामे होतील. भावंडांशी संबंध सुधारतील. छोट्या प्रवासाचा योग.
सिंह
आज धन स्थानी चन्द्र आहे.तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य उपाय केल्यास लाभ होईल.
आर्थिक बाबतीत लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.घाई ने निर्णय नको.
कन्या
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस.समोरच्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका.खर्च कमी करा.
तुळ
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
थोडा एकांत हवा वाटेल. मनात चिंता येऊ शकते. ध्यान-प्रार्थना करा.गैरसमज टाळा.
वृश्चिक
आज लाभ स्थानी चन्द्र आहे.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते.
धनु
आज दशम स्थानी चन्द्र आहे.
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल.
मकर
आज नवम स्थानी चन्द्र आहे.
भाग्य साथ देईल. नवीन शिकण्याची किंवा प्रवासाची संधी मिळेल.
कुंभ
आज अष्टम स्थानी चन्द्र आहे.महत्वाची कामे आज नको.
भावनिक चढ-उतार होऊ शकतात. आर्थिक व्यवहार जपून करा.
मीन
आज सप्तम स्थानी चन्द्र आहे.
नातेसंबंधांमध्ये लक्ष द्या. जोडीदारासोबत संवाद महत्त्वाचा आहे.दुसऱ्यांच्या मताचा आदर करा.





Leave a Reply