सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल त्रयोदशी/ श्री महावीर जयंती
🌸 नक्षत्र…. पु. फाल्गुनी
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ३१ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ३१ मार्च २०२६‼️
मेष: सकारात्मक विचार वाढवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, प्रेमळ वातावरण राहील. उपासना जप करा.
वृषभ: नविन खरेदीचा विचार प्रत्यक्ष रूप घेईल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मनस्वस्थतेसाठी ध्यान प्राणायाम करा. आरोग्यासाठी लाभदायक होईल.
मिथुन: अनावश्यक खर्च टाळावा. कुटुंबीयांमधील संवाद सुधारेल त्यामुळे आनंदी वातावरण असेल. आत्मविश्वासाने काम करा यश मिळेल.
कर्क: सकाळ अनुत्सहातून झाली तरी दुपारी कामात प्रगती चांगली होईल, आत्मविश्वास वाढेल. प्रवासातून अपेक्षित लाभ होतील.
सिंह: कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल. संवाद महत्वाचा असेल काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
कन्या: प्रसन्न राहून कार्याची सुरुवात करा. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबिक मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी उत्साहवर्धच ठरेल. कार्यक्षेत्रात नवी ओळख होईल.
तुला: आपल्या कार्यशैलीचा प्रभाव दिसेल वरिष्ठांकडून कौतुक मान सन्मान मिळेल. सामाजिक कार्यात यश लाभेल. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक: स्पष्टवक्तेपणामुळे हितशत्रुं दुखावतलील बोलण्यात सावधानता राखावी. नियोजित कामामध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. उपासना करा.
धनु: मानसिक स्थिरता असेल. ध्यान योग यामध्ये प्रगती साधेल. धार्मिक कार्य होईल. नियोजित कामामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन जमेल.
मकर: जबाबदारी वाढेल त्यामुळे परिश्रम वाढतील योग्य लाभ होतील. कामातून वेळ काढून थोडी विश्रांती घ्या. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.
कुंभ: कामाचे नियोजन व्यवस्थित करा नवीन संधीचा लाभ घेता येईल. मित्र जोडीदार यांची मदत मिळेल. सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा मान वाढेल.
मीन: चांगला दिवस आहे. उपासना घडेल. प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवन चांगले असेल.





Leave a Reply