सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्दशी/ दर्श अमावस्या / अमावस्या प्रारंभ स. ८:२६ मि.
🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपद
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. १८ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस व्यर्ज
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १८ मार्च २०२६ ‼️
मेष
आज दशमस्थानी चन्द्र आहे.
आज कामात प्रगती दिसू शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी दिवस अनुकूल आहे.
वृषभ
आज नवमस्थानी चन्द्र आहे.वडिलांचा आशीर्वाद लाभेल.
भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
मिथुन
आज अष्टमस्थानी चन्द्र आहे.सासुरवाडी कडून लाभ होऊ शकतो.
आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेता येईल.
कर्क
आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.
नातेसंबंध आणि भागीदारी यावर लक्ष द्यावे लागेल. संवादातून अनेक प्रश्न सोडवता येतील.जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू।शकते.
सिंह
आज षष्ठस्थानी चन्द्र आहे.
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कन्या
आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांकडून किंवा कुटुंबातून आनंदाची बातमी मिळू शकते. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल.शैक्षणिक यश मिळेल.
तुळ
आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.घरातल्या इंटेरिअर मध्ये बदल कराल,त्या साठी खर्च होईल.वाहन सौख्य लाभेल.
घरगुती कामात व्यस्त रहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक
आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळेल.कलागुण दिसून येतील.
धनु
आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल.कलाकारांना नवीन संधी येतील. बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे.
मकर
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.चैनीसाठी खर्च कराल.कामाचा झपाटा राहील.
कुंभ
आज व्ययस्थानी चन्द्र आहे.
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. शांतपणे विचार करण्यासाठी वेळ मिळेल. आर्थिक लाभ होतील.परदेशातुन संपर्क तुन लाभ होऊ शकतो.
मीन
आज लाभस्थानी चन्द्र आहे.मस्त सवंगड्या सोबत सहल घडेल.मौजमजा कराल.विवाह इच्छुकांना शुभ बातमी मिळु शकते.
मित्रमैत्रिणी किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. सामाजिक संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात.












Leave a Reply