सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण पंचमी / रंगपंचमी
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०८ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सायं ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०८ मार्च २०२६‼️
मेष:- संवादात स्पष्टता असावी. नियोजित कामात प्रयत्नपूर्वक यश मिळेल. थोडा ताण वाढेल. सकारात्मक विचार वाढवावेत.
वृषभ:- संयम ठेवा समोरच्याचे मत जाणून घ्या. कल्पनेतील कामे होतील थोडा वेळ द्यावा लागेल. संवादात स्पष्टता ठेवावी.
मिथुन: संयमाने काम करा मित्रपरिवारातून अनपेक्षित मदत मिळेल. आर्थिक कामे होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कर्क:- सावधानतेने कामामध्ये लक्ष द्यावे. अनावश्यक खर्च टाळावा. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. मन प्रसन्न राहील.
सिंह:- उत्साहाने व आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करा. अहंकार न ठेवता संबंधातील दुरावा कमी करता येईल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल.
कन्या:- मनाची चंचलता वाढेल. कामात बारकाईने लक्ष द्यावे. नित्यकामामध्ये प्रगती साधेल. सहकार्यांना न दुखावता काम करा.
तुळ:- भेटी गाठीतून संवादातून विरंगुळा होईल. आनंदी राहाल. भावनाशील होऊ नका. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृश्चिक:- हितशत्रु गुप्तशत्रु सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा ताण वाढू शकतो. महत्वाची कामे शक्य असल्यास पुढे ढकलावेत. उपासनेने मन प्रसन्न राहील.
धनु:- चांगला दिवस आहे. कामात प्रगती होईल. अनावश्यक खर्च टाळावा, नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. आर्थिक कामे होतील.
मकर:- कुठलाही निर्णय घेतांना संयमाने घ्या लाभ होईल. मित्र सहकारी यांचेकडून मदत होईल. नियोजित कामामध्ये यश लाभेल.
कुंभ:- व्यवहारात स्पष्टता व दक्षता ठेवा. सावधगिरीने पाऊल टाका. कल्पकता वापरुन केलेल्या कामामध्ये प्रगती साधेल. हितसंबंधींना न दुखावता कार्य साधा.
मीन:- समाधानकारक दिवस आहे. कामामध्ये प्रगती होईल. कौशल्यातून यश संपादन करा. कौटुंबिक जीवनात सुसंवाद होईल.












Leave a Reply