News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०१ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सायं ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०१ मार्च २०२६‼️

मेष: कल्पकतेने केलेल्या कामात वेळ वाचेल व कामात नवी दिशा मिळेल. चर्चात्मक संवादातून नविन गोष्टी सुचतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल.

वृषभ: भागीदारीतील कामात प्रगती साधेल. घरातील वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे.

मिथुन: केल्याने होत आहे सकारात्मक विचाराने आलेल्या संधीचा उपयोग करून घ्या. मान प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक कामे होतील.

कर्क: मनाची प्रसन्नता महत्वाची आहे. वादाचे रुपांतर संवादात होण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. घरातील वातावरण आनंदी असेल.

सिंह: प्रगती साधेल. नियोजित कामातून आर्थिक लाभ होतील. कुटुंबातून सहकार्य मिळेल. नविन कामासाठी अनुकूल दिवस आहे.

कन्या: चांगला दिवस आहे. सकारात्मकतेने कामात अडथळे दूर होतील. विचारपूर्वक संयमाने कामामध्ये यश लाभेल. आर्थिक नियोजन करा.

तुळ: सुसंवाद साधा त्यातून संबंध सुधारतील. अनावश्यक खर्च टाळा. नित्यकामामध्ये मन रमेल. अनुकूल दिवस आहे.

वृश्चिक: चांगला दिवस आहे. आत्मविश्वासपूर्वक काम करा. नविन जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ.

धनु: चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये भाग्याची साथ लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. चिंतनातून मनाची प्रसन्नता राहील.

मकर: आपल्या कर्तृत्वाने कुटुंबातील आनंद वाढेल. मानसिक शांती मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ: भेटी गाठी परिचयातून नवीन ओळख होईल. ओळखीतून कार्यसाधण्यासाठी मदत होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

मीन: आत्मविश्वास व उत्साहाने कार्य कराल. कामातून अपेक्षित उत्पन्न मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग होण्याचे योग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *