बीड -जिल्हा वकील संघांचे सदस्यऍडरामडोंगरे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत चोवीस तास झाले तरी गुन्हा दाखल नाही केल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाच्या दारातवकिलांनी कामबंद आंदोलनकेले.
बीड जिल्हा न्यायालयात आपले काम करत बसलेले ऍड राम डोंगरे यांना राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. विशेष म्हणजे याबाबत सर्व वकील बांधव शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र चोवीस तास उलटून गेले तरी अद्याप गुन्हा दाखल नाही झाल्याने जिल्हा न्यायालयाच्या दारात आंदोलन केले.
वकिलांना संरक्षण देणारा कायदा लागू करा, संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करा यासंह विविध मागण्यासाठी यावेळी आंदोलन करण्यात आले.












Leave a Reply