News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

डेमो हाऊसचे बांधकाम :दुखणं म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असा जिल्हा परिषदेचा कारभार!

बीड -जिल्हा परिषदेच्या आवारात बांधण्यात आलेले आणि एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश काढून भ्रष्टाचार करून लाखो रुपये पचवणाऱ्या डेमो हाऊस बाबत बातम्या आल्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे. त्यांनी वरिष्ठाना दिलेला खुलासा म्हणजे दुखणं म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असाच प्रकार आहे. यातून त्यांनी हे बांधकामं डेमो हाऊसचे नसून उमेद साठी असल्याचा धक्कादायक खुलासा करत पैसे पचवण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद आवारात डेमो हाऊस बांधण्याचे आदेश दिले. यासाठी किमान एक लाख चाळीस हजार आणि जास्तीत जास्त तीन लाख पन्नास हजार खर्च अपेक्षित केला होता. याप्रमाणे सर्वच जिल्हा परिषद आवारात हे डेमो हाऊस 2022 मध्ये बांधण्याचे आदेश दिले गेले.

बीड जिल्हा परिषद आवारात देखील हे डेमो हाऊस बांधले. मात्र यासाठी 2024 आणि 2025 असे दोन वेगवेगळे कार्यारंभ आदेश काढण्यात आले. विशेष म्हणजे किमान एक लाख चाळीस हजार खर्च अपेक्षित असताना पाच लाख पहिल्यांदा आणि पाच लाख दुसऱ्यांदा खर्च करण्यात आल्याचे दाखवले.

याबाबत न्यूज अँड व्यूज सहित अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रसारित झाल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने याची चौकशी लावली. पण चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या याप्रमाणे बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी त्यांच्यामार्फत केली गेली.

20260223 2059505826370925363084009
20260223 2100111880705759160300143

बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या अहवालात हे डेमो हाऊस घरकुल लाभार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून बांधले गेले याचा कुठेही उल्लेख नाही करता हे उमेद साठी बांधण्यात आल्याचे म्हटलं आहे.

वास्तविक पाहता सर्वात प्रथम हे डेमो हाऊस घरकुल लाभार्थी यांना पाहण्यासाठी बांधण्यात आले होते याचाच विसर बांधकामच्या कार्यकारी अभियंता यांना पडला असल्याचे त्यांच्याच अहवालतून स्पष्ट झाले आहे.

बांधकाम विभागात हे काम मंजूर करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. परंतु कार्यकारी अभियंता यांनी या सगळ्यांना वाचवत भ्रष्टाचार पचवण्याचा उद्योग केला आहे.हे म्हणजे मूळ मुद्याला बगल देण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान काय कारवाई करणारं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *