News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

मंडपात परीक्षा, केंद्रप्रमुखांवार कारवाई, मात्र गटशिक्षणाधिकारी मोकाट का?

बीड – दहावीच्या परीक्षा चक्क मंडप टाकून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यात उघडकीस आला याप्रकरणी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत शिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील यांनी दिले. या प्रकरणात केंद्रप्रमुख जेवढे जबाबदार आहेत तेवढेच गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे देखील जबाबदार असताना शिक्षणाधिकारी पाटील मॅडम या आपल्या अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.

एखाद्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात दहावी बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर करावयाचे असल्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा सोबतच संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून त्या परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती गोळा केली जाते.

परीक्षा केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार त्या ठिकाणी लाईट फॅन पिण्याचे पाणी स्वच्छतागृह आणि आसन व्यवस्था पुरेशी आहे का याची देखील पूर्ण माहिती घेऊन परीक्षा केंद्र मंजूर केले जाते. मात्र बीड तालुक्यातील कुर्ला येथे यशवंत विद्यालयात चक्क शाळेच्या इमारतीवर मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची वेळ आली.

एकीकडे बीड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन प्रयत्नशील असताना दुसरीकडे मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत असेल तर कॉपीमुक्त अभियान कसे यशस्वी होणार असा प्रश्न निर्माण झाला हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

त्याचसोबत संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्यावर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या संकेत दिले. या सगळ्या प्रकारात जेवढे दोषी केंद्र प्रमुख आहेत त्यापेक्षाही जास्त दोषी हे बीडचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि त्या भागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे हे देखील आहेत कारण परीक्षा केंद्राला मंजुरी देताना जी पाहणी करणे गरजेचे होते ती या अधिकाऱ्यांनी केली नाही त्यामुळे शिक्षण विभागाची इभरतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली अशावेळी केवळ केंद्रप्रमुखांवर कारवाई करून शिक्षण अधिकारी पाटील मॅडम या गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांना पाठीशी घालवून कारवाई पासून वाचवत तर नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *