News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

ध्वजारोहनच केले नाही, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षकांना पाठीशी घालण्याचा उद्योग!


बीड – बीड जिल्हा परिषदेच्या धोंडीपुरा केंद्रांतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील शाळेत 26 जानेवारी चे ध्वजारोहण केले गेले नाही हा अक्षम्य आणि दखलपात्र गुन्हा असतानाही महिना उलटला तरी गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी नोटीस पाठवण्यापलीकडे येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कुठलीच कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे.
बीड शहरातील इंदिरानगर भागात मंजूर असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही बालेपीर भागात एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये भरते विद्यार्थी संख्या आणि पटसंख्या कागदोपत्री दाखवून या ठिकाणी शिक्षकांनी आपली पदे वाचवलेली आहेत. फ्लॅटमध्ये भरणारी ही बहुदा बीड शहरातील किंवा जिल्ह्यातील पहिलीच शाळा असावी.
मात्र याकडे शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने कधीच लक्ष दिले नाही कारण येथील स्टाफ हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खुश करण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे ही शाळा कागदोपत्री भरल्याचे दाखवून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पगार उचलली जात होती.

दरम्यान 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सर्वत्र शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी संस्थांमध्ये ध्वजारोहण केले गेले मात्र बीड शहरा नजीक असलेल्या या शाळेत ध्वजारोहण झाले नाही. याबाबत न्यूज अँड व्ह्यूज ने वृत्त प्रकाशित केले त्यानंतर गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी या शाळेला तोंडी नोटीस देऊन खुलासा मागवला.

खुलासा आल्यानंतर कारवाईचे पत्र वरिष्ठांना पाठवण्यात आले नाहीतर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना गटशिक्षणाधिकारी समंदर खान हे पाठीशी घालत असल्यामुळेच कारवाई झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *