सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती सायं. ०५/३० मि./ वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी / कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही ( वेदादी नियम पाळु नये )
🌸 नक्षत्र…. धनिष्ठा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १७ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस व्यर्ज
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १७ फेब्रुवारी २०२६‼️
मेष:- चंद्र लाभ मंगळ आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. वादाचे प्रसंग येऊ शकतात. मात्र हा शुभ योग् असल्याने तुमचा विजय होणार आहे. धाडसी पाऊले टाकाल. वाहन जपून चालवा.
वृषभ:- तुमचा मूळ स्वभाव आक्रमक नसला तरी आज तुमचा वेगळा अवतार बघायला मिळणार आहे. काही कठोर निर्णय घ्याल. जमीन व्यवहारातून लाभ होतील.
मिथुन:- आज अष्टम मंगळाची अनुकूलता नसली तरी आज व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. जुनी येणी वसूल होतील. कोर्ट कामात यश मिळेल.
कर्क: स्वभावात तुम्ही शांत आणि प्रेमळ असलात तरी आज तुमचा नूर वेगळाच असणार आहे. तुमची आग्रही भूमिका असणार आहे. शत्रू पराभूत होतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल.
सिंह:- नेहमी पेक्षा वेगळ्या कामासाठी आजची वेळ राखून ठेवावी लागेल. जुनी येणी आज वसूल करा. खनिज व्यवसायात लाभ होतील. जमिनीची कामे मार्गी लागतील.
कन्या:- व्यवसायात आज तुमचा दबदबा असणार आहे. तुम्ही राबवलेल्या योजना यशस्वी होतील. त्याचे कौतुक होईल. भावंड मदत करतील.
तुळ:- धनेश उच्च असल्याने आर्थिक बाजू भक्कम असणार आहे. त्याचा शुभ योग आज तुम्हाला भरपूर लाभ करून देतील. अग्नी संबंधित व्यवसायातून विशेष यश मिळेल.
वृश्चिक:- आज तुमच्या राशीत चंद्र आहे. मंगळशी लाभ योग आहे नात्यातून अत्यंत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती भक्कम असणार आहे. तुमच्या पराक्रमाला कल्पकतेची जोड मिळेल.
धनु:- ग्रहमान संमिश्र आहे. तरीही आज तुमच्या बोलण्याचा मोठा प्रभाव पडणार आहे. जुने आर्थिक हिशोब पूर्ण करून घ्या. आळस टाळून कामाला लागावे लागेल.
मकर:-आज अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. वेळ दवडू नका. आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. आक्रमकता वाढेल. संधीचे सोने कराल.
कुंभ: दशम चंद्र आज व्यवसायिक कामे पूर्ण करण्याचे संकेत देत आहे. कामाचा ताण वाढणार असला तरी तो लाभदायक आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. त्याचे श्रेय देखील मिळेल.
मीन:- मंगळ सध्या अनुकूल आहे. भाग्यात चंद्र आज तुमचे भाग्य उज्ज्वल असल्याचे दर्शवत आहे. सर्व प्रकारचे लाभ होतील. दैवी उपासना जरूर करा.












Leave a Reply