बीड – बीड शहरातील बालेपीर परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर मध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झालेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फ्लॅटमध्ये भरणाऱ्या या शाळेच्या बाबतीत ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी शाळेकडे खुलासा मागवला असून कारवाईचा इशारा दिला आहे.
26 जानेवारी तसेच 15 ऑगस्ट आणि एक मे 17 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात तसेच शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये ध्वजारोहण करणे बंधनकारक आहे.
विशेषतः 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे राष्ट्रीय सण म्हणून सर्वत्र साजरे केले जातात मात्र बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर केंद्र धोंडीपुरा या शाळेत 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहणच झाले नाही.
पहिली ते पाचवी पर्यंत ही शाळा एका फ्लॅटमध्ये भरते अशी देखील धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे पटावर 28 विद्यार्थी संख्या असली तरी देखील प्रत्यक्षात या शाळेत विद्यार्थीच येत नाहीत. अशातच या शाळेत ध्वजारोहण न झाल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान फ्लॅटमध्ये भरणाऱ्या या शाळेत ध्वजारोहण झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा देत आपण शाळेला भेट दिली असून लेखी खुलासा देखील मागवला आहे त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच ही शाळा इतरत्र हलवली जाईल असे न्यूज अँड व्यूज शी बोलताना सांगितले.












Leave a Reply