News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल षष्ठी
🌸 नक्षत्र…. उ. भाद्रपदा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २४ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/3०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २४ जानेवारी २०२६‼️

मेष : आनंदी दिवस आहे. लाभातील चंद्र इच्छित लाभासाठी अनुकूल आहे. योग्य निर्णय घ्या आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. मित्रांकडून मदत मिळेल.

वृषभ : नविन कामामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जबाबदारी वाढेल त्याबरोबर प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संवादातील मधूरता यश मिळवून देईल.

मिथुन : नियोजित कामात यश मिळेल. सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. चिंता करू नका चिंतन करा.

कर्क : नविन जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी काही प्रमाणात तणाव राहू शकतो. सकारात्मक राहा. मनाने प्रसन्न राहा.

सिंह : भेटीगाठीतून चर्चेतून कामामध्ये प्रगती साधेल. भागीदारीत लाभ संभवतो. ध्यान उपासना मन प्रसन्नतेसाठी उपयुक्त ठरेल.

कन्या : नवनविन कल्पना सुचतील. हितशत्रुंपासून सावधानता ठेवावी. अनावश्यक विवाद घडू शकतो. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल.

तुळ : आध्यात्मिक आवड होईल. आपल्या नियोजित कामामध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. कलेमध्ये प्रगती साधाल मित्रांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : नित्यकामामध्ये यश मिळेल. वेळेत कार्य झाल्याने विश्रांतीसाठी वेळ मिळेल. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

धनु : कुटुंबातील सदस्यांच्या सहाय्याने पराक्रम कराल. आत्मविश्वास वाढेल. कौशल्यपूर्ण कार्य होईल. आर्थिक कामे होतील.

मकर : धनस्थानातील चंद्र मन प्रसन्न करणारे कार्य घडेल. आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सुसंवादाने कार्य केल्यास दीर्घकालिन परिणाम येतील.

कुंभ : आत्मविश्वासपूर्वक कार्य संपादन कराल. नविनकार्यारंभासाठी दिवस अनुकूल नाही. मित्र हितचिंतकांचे सहाय्य लाभेल.

मीन : नविन वस्तु खरेदी कराल. थोडी मेहनत घ्यावी लागेल, मनाप्रमाणे कार्य होईल. आध्यात्मिक विचार वाढतील. ध्यान प्राणायाम उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *