सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. उ.षाढा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १९ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १९ जानेवारी २०२६‼️
मेष
आज तुमच्यात आत्मविश्वास आणि धाडस दोन्ही वाढलेले दिसेल. महिलांसाठी हा दिवस “स्वतःसाठी उभे राहण्याचा” आहे. नोकरीत तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. घरात निर्णय घेताना पुढाकार घ्याल. संध्याकाळनंतर थोडा राग किंवा अधीरपणा जाणवू शकतो—शांतपणे प्रतिक्रिया द्या. नवीन जबाबदारी मिळू शकते. जोडीदाराशी थोडा अहंभाव टाळा,जुळवून घ्या.डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
वृषभ
आजचा दिवस सौख्य, स्थैर्य आणि समाधान देणारा आहे. घर, कुटुंब, मुलं, संसार यामध्ये मन रमेल. सौंदर्य, फॅशन, स्वत:कडे लक्ष द्याल. आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.
वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
घसा, सर्दीचा त्रास होऊ शकतो.
मिथुन
आज संवादशक्ती ही तुमची खरी ताकद ठरेल. बोलण्यात गोडवा, विचारात स्पष्टता राहील. महिलांसाठी मैत्री, सोशल मीडिया, शिकणे-शिकवणे यासाठी उत्तम दिवस. संध्याकाळनंतर जुन्या आठवणी उफाळू शकतात.
लेखन, बोलणे, मार्केटिंग लाभदायक.
मानसिक थकवा राहील.
कर्क
आज हा दिवस “मन जपण्याचा” आहे. कुटुंबाची जबाबदारी निभावाल, पण स्वतःकडेही लक्ष द्या. आई, वृद्ध महिला यांच्याशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील.
कामात हळु हळू स्थिरता येईल.
पचन, अँसिडिटी त्रास होऊ शकतो.
सिंह
आज मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि आत्मभान वाढवणारा दिवस आहे. नेतृत्वगुण दिसून येतील. तुमच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी येऊ शकतात. संध्याकाळनंतर अहंकार टाळणे आवश्यक.
कामात वरिष्ठांचा पाठिंबा राहील. जोडीदाराचा अभिमान वाटेल
उष्णतेचा त्रास, थकवा जाणवेल.
कन्या
आज शिस्त, नियोजन आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम होईल. सेवा, आरोग्य, शिक्षण, ऑफिस कामात प्रगतीचा दिवस. लहान गोष्टींचा ताण घेऊ नका.
तुमच्या कामाची दखल घेतली जाईल
मान, पाठीचा त्रास संभवतो.
तुळ
आज चंद्र तुमच्याच राशीत असल्याने दिवस तुमच्यासाठी फार खास आहे. सौंदर्य, आकर्षण, व्यक्तिमत्त्व उजळेल. आज आत्मविश्वास, नात्यांत समतोल आणि सामाजिक यश मिळेल. लोकांशी संबंधित कामात यश
जोडीदाराशी प्रेम, समज वाढेल.पण काही तणाव राहील.
वृश्चिक
सायंकाळ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. आत्मविश्वास वाढेल. आजचा हा दिवस अंतर्मुखतेचा, आत्मपरीक्षणाचा आहे. संशय, राग, गैरसमज टाळा.
गुप्त योजना यशस्वी होतील.
चिडचिड टाळा.
धनु
आज गुरुचा प्रभाव खूप शुभ आहे. महिलांसाठी शिक्षण, अध्यात्म, मार्गदर्शन यामध्ये प्रगती होईल. मोठ्या स्त्री व्यक्तीकडून मदत मिळू शकते. मार्ग स्पष्ट होईल.संध्याकाळ विश्रांती ची.
गुडघे, पाय दुखू शकतात.
मकर
जबाबदारी, कष्ट आणि संयम आज फळ देतील. हा दिवस मेहनतीचा असला तरी समाधान देणारा आहे. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.थकवा जाणवेल.
कुंभ
हर्शल योगामुळे आज अचानक बदल, नवीन कल्पना, वेगळा दृष्टिकोन मिळेल. , सामाजिक काम, नवीन प्रयोग फायदेशीर.
कामकाजात नावीन्यपूर्ण यश
नातेसंबंध मैत्री मजबूत राहतील.
मीन
आज अंतःप्रेरणा फार मजबूत राहील. कला, संगीत, अध्यात्म, सेवा यामध्ये मन रमेल. भावनिक समाधान मिळेल.करीयर मध्ये यश.












Leave a Reply