सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण चतुर्दशी/ अमावस्या प्रारंभ रात्री ००/०३ मि.
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १७ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १७ जानेवारी २०२६‼️
मेष: चांगला दिवस आहे. भेटीगाठी कार्यसाधक होतील. आर्थिक कामे होतील. जोडीदाराशी काही मतभेद होतील क्षणिक असतील.
वृषभ: आनंदाने उत्साहाने काम कराल. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्र सहकारी मदत करतील प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक नियोजन करा.
मिथुन: संवाद साधतांना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. स्पष्ट मत मांडा अभ्यासासाठी अनुकूल दिवस. प्रवास कार्यसाधक होईल.
कर्क: अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. भावूकतेने मदत कराल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. जनसंपर्कातून कार्यसिध्दि होईल.
सिंह: उत्साहाने आत्मविश्वासाने कार्य कराल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे तरीही तज्ञांचा सल्ला घेऊन नविन काम हाती घ्यावे.
कन्या: चांगल्या कामामुळे प्रतिष्ठा वाढेल. मित्र सहकारी यांच्याकडून कौतुक होईल. आर्थिक काम होईल. मना समाधान वाटेल.
तूळ: नविन जबाबदारी मिळू शकेल. कामातील कौशल्यामुळे वरिष्ठ खूष असतील. दिवस उत्तम. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक: हितशत्रुं पासून सावधानतेने व्यवहार करावेत. प्रलोभनांना भुलु नका. संयमाने अडचणीवर मात कराल. यश मिळेल.
धनु: नियोजनानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. मनाची चंचलता असेल.
मकर: मनाप्रमाणे काम झाल्याने प्रसन्नता वाढेल. जबाबदाऱ्या वाढतील त्या पूर्ण करण्यास सक्षमता असेल. आर्थिक कामे होतील. जनसंपर्कातून कामे होतील.
कुंभ: नवनवीन कल्पनांनी भरलेला दिवस आहे. नित्य नैमित्तिक कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.
मीन: चांगला दिवस आहे. आध्यात्मिक चिंतन घडेल त्यातून मनःशांती मिळेल. मित्र सहकारी यांचेकडून सहकार्य लाभेल.












Leave a Reply