सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वितीया
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०५ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०५ जानेवारी २०२६‼️
मेष: काही चांगले घडण्यासाठी दोन पावले पुढे टाका. फक्त विचार करू नका विचार जबाबदारीने अमलात आणा. आर्थिक कामे होतील. नात्यामध्ये प्रसन्नता राहील.
वृषभ: मनातून नसलेल्या कामामध्ये मदत करावी लागेल. सकारात्मक विचार वाढवा. नित्यकामामध्ये यश मिळेल. खरेदी कराल. घरातील अनुकूलता असेल.
मिथुन: वेळेचा सदुपयोग करा. नियोजित कार्यासाठी भटकंती होउ शकते. कुणाला शब्द देतांना विचारपूर्वक द्या. मित्रांची मदत होईल.
कर्क: चांगला दिवस आहे. काही नियोजन कराल त्यात यश मिळेल. नुसता विचार करू नका कृती करा. यश तुमचेच आहे. प्रतिष्ठा सन्मान प्राप्त होईल.
सिंह: मनाची प्रसन्नता राहील. प्रवास घडू शकतो. नववा चंद्र आध्यात्मिक गोष्टीतून आनंद मिळेल. संकल्पीत कामामध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
कन्या: मित्र संगतीतून काही नविन संकल्पना सुचतील. नविन जबाबदारीतून आर्थिक लाभ होतील. मनात चलबिचल ठेवू नका. स्पष्ट मत मांडा.
तुळ: चांगला दिवस आहे. जोडीदाराशी चांगले जमवून घ्याल. नविन खरेदी करू शकाल. मित्र नातेवाईक भेटीतून आनंदी राहाल. खर्चावर नियंत्रण अवश्यक आहे.
वृश्चिक: हितशत्रुंपासून सावधानता ठेवावी. काही गोष्टी मौनाने साधता येतात. प्रतिष्ठा राहील. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
धनु: शब्दाने शब्द वाढत जातो. थोडे शांत राहा. संवाद साधतांना पूर्वग्रहदूषीत राहू नका. सद्यस्थिती समजून घ्या. उपासनेने चांगले यश मिळेल.
मकर: नियोजित कार्यामध्ये यश मिळेल. व्यवसायात नविन भागिदार नविन जबाबदारी येवू शकते. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
कुंभ: विचारपूर्वक कृती करा. आपल्या मनाच्या चलबिचल स्थितीचा फायदा दुसरे घेवू शकतात. मोजके बोला. ध्यान प्राणायाम करा. अनुकूलता वाढेल.
मीन: चांगला दिवस आहे. मनातील विचार स्पष्टपणे मांडा. नवीन संधी चालून येतील. भेटीगाठीतून चांगले प्रगतीशील कार्य साधता येईल.












Leave a Reply