सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पुष्य शुक़्ल द्वितिया
🌸 नक्षत्र…. उ. षाढा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २२ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २२ डिसेंबर २०२५‼️
मेष
आज
आज मन थोडे भावूक राहील. चंद्र–शुक्र युतीमुळे सौंदर्य, कपडे, दागिने यावर खर्च होऊ शकतो. घरातील जबाबदाऱ्या जास्त वाटतील, पण संध्याकाळी समाधान मिळेल. पती/सहकारी यांच्याशी संवाद जपून ठेवा.
वृषभ
आज
नातेसंबंधात गोडवा येईल, पण अपेक्षा जास्त ठेवल्यास निराशा होऊ शकते. शनीचा प्रभाव असल्याने संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल.
मिथुन
आज
आज थोडा थकवा जाणवेल. घर, मुलं, काम या सगळ्याचा ताण येऊ शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. रात्रीनंतर मन हलके होईल.
कर्क
आज
चंद्र–शुक्र योगामुळे प्रेम, मैत्री आणि भावनिक आधार मिळेल. जोडीदाराशी मनमोकळे बोलता येईल. कला, संगीत, आवड जोपासण्यासाठी उत्तम दिवस.
सिंह
आज
घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील. आई किंवा घरातील ज्येष्ठांशी संवाद वाढेल. शनीमुळे निर्णय घेताना घाई टाळा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला.
कन्या
आज
आज बोलण्यात गोडवा ठेवल्यास कामे सोपी होतील. सहकारी, मित्र मैत्रिणी यांचे सहकार्य मिळेल. छोटा प्रवास किंवा फोन कॉल आनंद देईल.
तुळ
आज
पैशाच्या बाबतीत चढ-उतार जाणवतील. खर्च वाढू शकतो, विशेषतः सौंदर्य, घरसजावटीवर. स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा; स्वतःला कमी लेखू देऊ नका.
वृश्चिक
आज
तुमचा दिवस असल्याने स्वतःसाठी वेळ द्याल. चंद्र–शुक्र योगामुळे आकर्षण वाढेल, पण चंद्र–शनीमुळे मनावर दडपण येऊ शकते. स्वतःला समजून घ्या, शांत रहा.
धनु
आज
चंद्र तुमच्या राशीत येईल . मन आनंदी राहील. दिवसाच्या सुरुवातीला अंतर्मुखता राहील, पण रात्री आत्मविश्वास वाढेल. ध्यान, प्रार्थना लाभदायक.
मकर
आज
, समाजकार्य यामधून समाधान मिळेल. मात्र शनी–गुरू योगामुळे जबाबदाऱ्या वाढतील. मदत करताना स्वतःचा विचारही करा.
कुंभ
आज
कामाच्या ठिकाणी बदल किंवा नवीन कल्पना सुचतील. रवि–हर्षल योगामुळे अनपेक्षित घडामोडी संभवतात. वरिष्ठ महिलांशी मतभेद टाळा.
मीन
आज
आज अध्यात्म, वाचन, मनन याकडे ओढ असेल. गुरू–शनी योगामुळे संयमाची परीक्षा घेतली जाईल. अनुभवातून शहाणपण येईल, घाई नको.












Leave a Reply