सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी
🌸 नक्षत्र…. पूर्वा फाल्गुनी
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ११ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/५९ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ११ डिसेंबर २०२५‼️
मेष
आज
आज घरात आनंददायी वातावरण राहील. सर्वाना कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळेल. वैयक्तिक कामे झपाट्याने पूर्ण होतील. भावनांवर नियंत्रण ठेवून बोलणे फायदेशीर.
वृषभ
आज
तुमचे शब्द आज प्रभावी ठरतील. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. प्रवास किंवा भेटीगाठी वाढतील. आरोग्य उत्तम पण पचनाकडे लक्ष द्या.
मिथुन
आज
आर्थिक बाबतीत आज थोडा दिलासा मिळेल. पूर्वी अडकलेले काम पुढे सरकेल. खरेदीची इच्छा वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराकडून प्रेम लाभेल.
कर्क
आज
चन्द्र तुमच्या राशीत असल्याने आज तुमचा दिवस! सौंदर्य, आकर्षण आणि भावनिक संतुलन वाढेल. महत्वाची कामे हातात घ्यायला उत्तम वेळ. आत्मविश्वासात वाढ.
सिंह
आज
मनात थोडा भूतकाळ उचंबळून येईल परंतु नकारात्मकतेपासून दूर राहा. मेडिटेशन किंवा एकांत फायदेशीर. गुप्त मदत किंवा मार्गदर्शन मिळेल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे.
कन्या
आज
मैत्री आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून फायदे मिळतील. महिलांना विशेषतः मैत्रिणीकडून मदत किंवा चांगली बातमी मिळू शकते. सामुहिक कामात यश.
तुळ
आज
कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. वरिष्ठ स्त्री व्यक्तीकडून सहकार्य मिळण्याची शक्यता. दिशा मिळेल. स्वतःचे मत ठामपणे मांडा.
वृश्चिक
आज
नवीन शिकण्याची इच्छा वाढेल. महिलांसाठी प्रवास, कोर्सेस किंवा आध्यात्मिक साधना अनुकूल. परदेशी संपर्कातून चांगला संवाद होईल.
धनू
आज वाहन काळजीपूर्वक चालवा.
भावनिक जवळीक वाढणारा दिवस. जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती तुम्हाला आधार देतील. आर्थिक कागदपत्रांमध्ये काळजी घ्या. आरोग्य चांगले.
मकर
आज
नाती सुधारण्यासाठी उत्तम. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. महिलांना विशेषतः भावनिक समाधान मिळेल. वाद विवाद टाळा.
कुंभ
आज
कामात व्यस्त रहाल. आरोग्य सुधारेल. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील. व्यवस्थापन उत्तम राहील. छोटी प्रवासाची शक्यता.
मीन
आज
रोमान्स, सृजनशीलता आणि आनंद वाढेल. मुलांशी संबंधित शुभ दिवस. कलात्मक क्षेत्रात प्रगती. हृदयाशी संबंधित निर्णयांमध्ये सकारात्मकता.












Leave a Reply