बीड –राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी aanis शिक्षक यांच्या प्रमाणपत्राची तपासणी बुधवारी 8 आक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेने याबाबत आदेश काढले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने लाभ मिळवले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी याबाबत झाडाझडती सुरु केली आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पदोन्नती आणि इतर लाभ घेण्यासाठी या प्रमाणपत्राचा आधार घेतल्याच्या तक्रारी आहेत.
यापूर्वी तत्कालीन सिइओ अजित पवार यांच्या काळात देखील प्रमाणपत्र तपासणी झाली होती. मात्र अनेकांना मुंबई येथे जाऊन जे जे रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु ते प्रकरण तेव्हा मॅनेज झाले, त्यामुळे यावेळी तरी तपासणी योग्य पद्धतीने होणार का अशी चर्चा आहे.
विशेष करून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यामध्ये या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा सुळसुळाट झालेला आहे. याबाबत जिल्हा परिषदेने शुक्रवारी एका आदेशाद्वारे 8 आक्टोबर रोजी सगळ्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.












Leave a Reply