News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250924 WA0039

गणेशोत्सव स्पर्धेत बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास तृतीय पुरस्कार!

बीड – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य आणि जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार धारूर, द्वितीय अंबाजोगाई आणि तृतीय पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे.

राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेश मंडळासाठी विविध पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्य, सामाजिक जनजागृती या विषयावर देखावे सादर करणाऱ्या मंडळाना पुरस्कार जाहीर केले होते.

जिल्हा आणि राज्य पातळीवर ही स्पर्धा आयोजित केली होती. बीड जिल्ह्यातून धारूर येथील जय किसान गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार पन्नास हजार रुपये, द्वितीय पुरस्कार चाळीस हजार रुपये अंबाजोगाई च्या सरस्वती गणेश मंडळास आणि तृतीय तीस हजार रुपयांचा पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *