शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीत शिंदे, संस्थाचालकांनी करोडो छापले!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील तब्बल 215 पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील जवळपास 400 ते 500 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता देत त्यांची संच मान्यता मंजूर केली या सगळ्या नियुक्त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचे एसआयटी चौकशीत स्पष्ट झाले असून शुक्रवार ते मंगळवार या पाच दिवसात वैयक्तिक चौकशीसाठी कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे
नागपूर गडचिरोली अमरावती जळगाव वर्धा नाशिक या जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तब्बल 22 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आणि संस्था चालकांना अटक झाली आहे.
दरम्यान याच पद्धतीचा अवलंब करत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या भागातही बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची भरती झाल्याचे तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या त्यानंतर याप्रकरणी पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात आली.
या यासाठी ने प्रत्येक शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षक यांना आदेशित करत 2012 ते 25 यादरम्यान नोकरीच लागलेल्या सर्व शिक्षकांची कागदपत्रे ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ऑनलाइन झालेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या असून एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास तीन ते चार हजार कर्मचारी बोगस असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान बीडचे माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता देणे असेल किंवा बदली मान्यता देण्याचा प्रकार असेल अशा अनेक बेकायदेशीर कामांना मंजुरी दिली. याबाबतचा अहवाल आणि कागदपत्रांच्या त्रुटी यासाठी समोर आल्या असून बीड जिल्ह्यातील 215 पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील 300 ते 400 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.
बीड जिल्ह्यात नागनाथ शिंदे व त्यांच्या पूर्वीच्या ज्या ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्था चालकांकडून लाखो रुपये घेऊन बोगस कागदपत्रांच्या आधारावर भरती केलेली आहे आणि ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी शुक्रवार ते मंगळवार दरम्यान होणार आहे त्या सगळ्यांची यादी न्यूज अँड व्यूज कडे प्राप्त झालेली आहे शाळांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत गेल्या वर्षभरापासून न्यूज अँड व्यूज या प्रकरणात पाठपुरावा करत असून जोपर्यंत बोगस शिक्षक संस्थाचालक आणि भरती करणारे अधिकारी यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
बीड जिल्ह्यात बीड माजलगाव अंबाजोगाई या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शाळा कॉलेज असणाऱ्या मोठ्या शिक्षण प्रसारक संस्था सहित एक युनिट असलेल्या संस्थेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी सुरू झाली आहे.
शुक्रवार 12 सप्टेंबर ते मंगळवार 17 सप्टेंबर पर्यंत छत्रपती संभाजी नगर येथील उपसंचालक कार्यालयामध्ये आपल्याकडील सर्व ओरिजनल कागदपत्रांसहित चौकशीसाठी हजर राहावे असे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून जे कर्मचारी या चौकशीस हजर राहणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवा समाप्ती केली जाईल असेही म्हटले आहे.
या आदेशानंतर गुरुवारपासूनच अनेक कर्मचारी हे आपल्या संस्थाचालकांकडून कागदपत्रे घेऊन त्यांना सोबत घेत संभाजीनगर मध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार अशा पाच दिवसात बीड जिल्ह्यातील जवळपास 300 पेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपसंचालक कार्यालयात चौकशी होणार आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांसहित त्यांचे कुटुंबीय आणि संस्थाचालक यांचे धाबे दणाणले आहेत.












Leave a Reply