बीड – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी व मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सोलापूर धुळे महामार्गांवर काही दिवसापूर्वी गढी नजिक सहा तरुणांना भरधावं वाहणाने चिरडले होते. या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण स्थळ आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.












Leave a Reply