News & View

ताज्या घडामोडी

1851004 toll plaza

कोणत्या टोल नाक्यावर मिळणार लाभ!

बीड -चारचाकी वाहनांना वार्षिक पास योजनेची सुरवात 15 ऑगस्ट पासून झाली आहे. या योजनेत नेमक्या कोणत्या टोल नाक्यावर या पासचा लाभ मिळेल याबद्दल वाहन धारकांच्या मनात अनेक शंका आहेत. राज्यातील 96 टोल नाक्यावर या पासचा उपयोग होणार आहे.

15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास सुरु होणार आहे. या वार्षिक पासमुळे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० टीपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. 3000 रुपयांत मिळणाऱ्या या पासचा उपयोग राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर करता येईल. मात्र राज्यमहामार्ग किंवा पालिकेच्या टोल प्लाझांवर या पासचा उपयोग होणार नाही. सातारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी याचा मोठा फायदा होईल. राज्यात कोणकोणत्या महामार्गांवर या वार्षिक पासचा उपयोग होईल.

सध्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल मोजावा लागतो. आता केंद्र सरकारने बिगर व्यावसायिक वाहनांसाठी पुन्हा सवलत लागू केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन महिन्यांपूर्वी त्या सवलतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता स्वातंत्र्य दिनापासून होणार आहे. कोणत्याही व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनांसाठी ही सवलत मिळणार नाही. तीन हजार रुपये एकदाच भरल्यानंतर सवलत मिळणारे बिगर व्यावसायिक वाहन देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावरून २०० हेलपाटे मारू शकणार आहे

जाणून घ्या सर्व टोल प्लाझांची यादी एका क्लिकवर

चारोटी – सुरत-दहिसर
२. खानीवाडे – सुरत-दहिसर बायपास
३. अहमदनगर बायपास – अहमदनगर बायपास
४. तिडगुंडी – सोलापूर-विजापूर
५. तसावडे – सातारा-कागळ
६. किणी – सातारा-कागळ
७. सावळेश्वर – पुणे-सोलापूर
८. वरवडे – पुणे-सोलापूर
९. पाटस – पुणे-सोलापूर
१०. सरडेवाडी – पुणे-सोलापूर
११. आनेवाडी – खंडाळा-सातारा
१२. खेड-शिवपूर – वेस्टर्ली डायव्हर्जन टू पुणे, कात्रज रियललाइनमेंट आणि कात्रज-सारोळे
१३. चांदवड – पिंपळगाव-धुळे
१४. लालींग – पिंपळगाव-धुळे
१५. बसवंत – पिंपळगाव-नाशिक-गोंडे
१६. घोटी – वडापे-गोंडे
१७. अर्जुनल्ली – वडापे-गोंडे
१८. तामलवाडी – सोलापूर-येडशी
१९. येडशी – सोलापूर-येडशी
२०. धोकी – एंड ऑफ आणे घाट टू स्टार्ट ऑफ अहमदनगर
२१. दुमहरवाडी – माळशेज घाट टू आणे घाट
२२. हिवरगाव पावसा – खेड-सिन्नर
२३. फुलवाडी – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२४. तळमोड – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२५. चाळकवाडी – खेड-सिन्नर
२६. वळसांग – अक्कलकोट-सोलापूर
२७. नंदानी – सोलापूर-विजापूर
२८. चाचाडगाव – नाशिक-पेठ
२९. अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३०. बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३१. इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
३२. पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
३३. डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
३४. पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
३५. पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
३६. उंडेवाडी – पाटस-बारामती
३७. बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
३८. निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
३९. पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
४०. बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
४१. भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
४२. बडेवाडी – खरवडी कासार-जंक्शन
४३. गोंधखैरी – नागपूर-कोंढळी
४४. करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
४५. निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
४६. नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
४७. कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
४८. तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
उंद्री – खामगाव-चिखली
५०. तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
५१. मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
५२. धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
५३. करोडी – औरंगाबाद-करोडी
५४. हातनूर – करोडी-तेलवाडी
५५. माळीवाडी-भोकरवाडी – येडशी-औरंगाबाद
५६. पादळसिंगी – येडशी-औरंगाबाद
५७. पारगाव – येडशी-औरंगाबाद
५८. वैद्याकीन्ही – मांजरसुम्बा-चुंभळीफाटा
५९. नायगाव – मंठा-पातुर
६०. लोणी – परतूर-माजलगाव
६१. शेंबळ – वरोरा-वणी
६२. हिरापूर – गडचिरोली-मूल
६३. खरबी – नागभीड-आर्मोरी
६४. केलापूर – वडनेर देवधरी केळापूर
६५. हुस्नापूर – यवतमाळ-वर्धा
६६. निअर हळदगाव – वर्धा-बुटीबोरी
६७. वडगाव – कळंब राळेगाव वडकी
६८. उमरेड – कळंब राळेगाव वडकी
६९. सोंगिर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७०. शिरपूर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७१. बोरविहीर – बोध्रे-धुळे
७२. दासरखेड – नांदुरा ते चिखली
७३. नाशिराबाद – चिखली ते तारसोड
७४. सुबगव्हाण – तारसोड ते फागणे
७५. दरोडा – बोरखेडी-जाम-वडनेर
७६. नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
७७. बोरखेडी – नागपूर हैदराबाद
७८. पांजरि – नागपूर बायपास
७९. खुमारी – एमपी/एमएच बॉर्डर नागपूर
८०. कामठी कन्हान – कामठी कन्हान बायपास नागपूर
८१. मठानी – नागपूर ते वैनगंगा
८२. सेलू – सावनेर-धापेवाडा-काल्मेश्वर गोंडखैरी
८३. चंपा – नागपूर-उमरेड
८४. भागेमारी – नागपूर-बैतुल
८५. मिलानपूर – नागपूर-बैतुल
८६. खांबारा – नागपूर-बैतुल
८७. खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
८८. पावनगाव – रिंग रोड नागपूर पॅकेज – २
८९. सेलू अंबा – लोखंडी सावरगाव ते रेणापूर
९०. अष्टा – औसा ते चाकूर
९१. मालेगाव – चाकूर ते लोहा
९२. परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
९३. बिजोरा – वारंगा ते महागाव
९४. आशीव – तुळजापूर ते औसा
९५. सालावा झारोडा – पांगारे ते वारंगा फाटा
९६. भांब राजा – महागाव ते यवतमाळ

तीन हजार रुपयांत २०० हेलपाटे सवलतीत’ या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार चालकास ॲन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून Rajmarg Yatra – Nhai हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यावर लॉगिन करून वाहनाचा क्रमांक टाकून पैसे भरल्यास सवलत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *