पैशासाठी संस्थाचालकाकडे तगादा!
बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे बीडमधील एका शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही शिक्षकांनी एक गुप्त बैठक घेतली. यामध्ये आपली नोकरी राहणार नसेल तर पैसे परत मागण्यासाठी संस्थाचालकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शिक्षकांनी तर पैशासाठी तगादा सुरु केला आहे.
नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळा बाहेर निघाल्यानंतर सरकारने राज्यातील सर्वच शिक्षकांची चौकशी करण्यासाठी एस आय टी गठीत केली आहे.
पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त या एस आय टी ने सर्व मुख्याध्यापक यांना 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत.
पे युनिट च्या अधीक्षकांनी तर माहिती अपलोड नाही केल्यास पगार बंद करण्याचा ईशारा दिला आहे.
या सगळ्या घडामोडीमुळे लाखो रुपये संस्थाचालकांना देऊन नोकरी मिळवलेले शिक्षक, कर्मचारी यांचे धाबे दनानले आहेत. दरम्यान बीड शहरातील वाड्यात भरणाऱ्या एका शाळेतील चौकशी सुरु झालेल्या शिक्षकांनी गुप्त बैठक घेतली.
शासनाकडून होणारी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपली नोकरी जाणार असेल आणि जेलची हवा खावी लागणार असेल तर आताच नोकरी सोडून आपले पैसे परत घेऊन या सगळ्या लफड्यातून बाहेर पडलेले बरे अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.












Leave a Reply