News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1755077358699

स्वछता, पाणीपुरवठा, रस्ते, नाल्याबाबत आ क्षीरसागरांनी घेतला आढावा!

बीड – नगर पालिका हद्दीतील रस्त्यांची कामे, स्वच्छता, पाणी पुरवठा यासंह इतर विकास कामाबाबत बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेचे नूतन सिओ शैलेश फडसे यांच्यासोबत आढावा घेतला. विकास कामात खंड नाही पडू देता तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

नगर परिषद बीड कार्यालयात मुख्याधिकारी फडसे यांच्यासोबत आ संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांना मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या व अनेक विषयांचा आढावा घेतला. प्रामुख्याने
१) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करणे.
२) चालू असलेल्या विविध विकासकामांची सद्यस्थितीचा आढावा घेतला.
३) शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठा बाबत आढावा.
४) बीड शहरातील पार्किंग व्यवस्था करणेसाठी प्रस्तावित जागा ३७ (ए) प्रस्तावावर निर्णय
५) घरकुल योजना, विद्युत पुरवठा तसेच सार्वजनिक शौचालय उभारणीबाबत आढावा घेतला
६) पेठ बीड भागातील मच्छी मार्केट इमारत व जुनी भाजी मंडई येथील मटन मार्केट इमारत तसेच सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील भाजी मंडई इमारती बाबत आढावा घेतला.
७) उर्दूघर च्या उभारणीसाठी जागा निश्चित करणे.
८) कोंडवाडा नूतनीकरण बाबत आढावा घेतला.
९) STPT plant बाबतच्या कामाचा आढावा घेतला.
१०) मोकाट जनावरांसाठी नुतन कोंडवाडा तयार करणे.
११) बीड शहरातील प्रमुख रस्ते जिल्हा नियोजन समिती कडे प्रस्तावीत करण्याबाबत देखील चर्चा झाली. बीड शहरातील धानोरा रोड, धानोरा रोड ते अंकुश नगर रोड, राजूरीवेस- कारंजा- बलभीम चौक रोड, स्टेडियम परिसरातील रोड, बुंदेलपुरा रोड, कबाड गल्ली रोड यासह शहरातील महत्वाच्या अन्य रस्त्यांचे कामे प्रतक्षात लवकरच सुरू होणार आहेत या बाबत सविस्तर चर्चा झाली.
१२) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत अनेक विकास कामांना मंजुरी देण्याबाबत चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *