News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250806 WA0046

आ संदीप क्षीरसागर यांनी मानले अजित दादांचे आभार!

बीड – बीड जिल्हा क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांनी २५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. बुधवारी (दि.६) रोजी झालेल्या बैठकीत हि मंजुरी देण्यात आली. बीड मतदारसंघासह जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रा संबंधित विकासाला चालना दिल्याबद्दल चालना दिल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.


बीड शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी अनेक विकास कामे होणे आवश्यक होते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. बीड विधानसभा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातील विविध खेळाडू या ठिकाणी सरावासाठी असतात. त्यांना दर्जेदार सुविधा आणि आवश्यक संसाधने यांची उपलब्धता असणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावण्यासाठी खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून आ.संदिप क्षीरसागर यांचा, जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध विकास कामे होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता.

त्यावर बीड येथे झालेल्या बैठकीत ना.अजितदादांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन २५ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आ. क्षीरसागर यांनी ना.अजित दादांचे यांचे आभार मानले आहेत.

  • ४०० मीटरचे अपग्रेडेशन, रनिंग ट्रॅक (सिंथेटिक ट्रॅक). फुटबॉल/हॉकी ग्राउंड, ट्रॅक आणि मुख्य खेळाच्या मैदानाभोवती नैसर्गिक गवताचे मैदान आणि आरसीसी ड्रेन, मुख्य मंडप इमारतीचे नूतनीकरण आणि प्रेक्षकांसाठी खुर्च्या इ.
  • इनडोअर हॉल इमारतीचे अपग्रेडेशन करणे.
  • वसतिगृह इमारतीचे प्रस्तावित बांधकाम तिसरा मजला आणि ग्राउंड-प्ले चे अपग्रेडेशन करणे.
  • नवीन वसतिगृह इमारत आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे प्रस्तावित बांधकाम करणे.
  • जॉगिंग ट्रॅकचा प्रस्तावित विकास करणे.
  • व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आणि स्केटिंग, बास्केट बॉल कोर्ट (काँक्रीट) सारख्या विविध खेळाच्या मैदानांचा विकास करणे.
  • बाह्य विद्युतीकरण, फर्निचरचे काम आणि अग्निशमन व्यवस्था करणे.
  • पाणीपुरवठा व्यवस्था आणि पाणी साठवण टाकी -५००००० जमीन क्षमता, कंपाउंड वॉल बांधणे आणि नूतनीकरण, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था आणि मार्ग, मुख्य प्रवेशद्वाराचे पार्किंग क्षेत्र सुधारित करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *