News & View

ताज्या घडामोडी

sarkarnama 2025 07 08 124e8d5b BJP Suresh Dhas son Sagar

आ धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू!

अहिल्यानगर -भाजपचे आष्टी मतदार संघांचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकी गाडीने दुचाकी गाडीला धडक दिली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीने जाणाऱ्या नितीन शेळके यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे.

सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाची मागून धडक ही नितीन शेळके यांच्या दुचाकीला बसली. रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. अहिल्यानगर पुणे महामार्गावर ही घटना घडलीये. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सागर सुरेश धस आणि सचिन कोकणे हे आष्टीवरून पुण्याला निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये शेळके या तरुणाचा मृत्यू झाला. गाडी सागर चालवत होता कि दुसरा कोणी याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सुप्पा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा हिट अँड रन चा असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *